...अन् सुष्मिता सेननं उर्वशीकडून काढून घेतला मिस यूनिव्हर्सचा क्राउन! विजेती ठरुनही दाखवला बाहेरचा रस्ता?
Sushmita Sen - Urvashi Rautela : उर्वशी रौतेलानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Sushmita Sen - Urvashi Rautela : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही नेहमीच तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. आपल्या सगळ्यांना माहितच आहे की उर्वशी ही 2015 च्या 'मिस यूनिवर्स कॉम्पटिशन' स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत होती. तर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशीनं मिस यूनिव्हर्स असलेल्या सुष्मिता सेनविषयी अशी एक गोष्ट सांगितली आहे. ज्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे.
उर्वशीनं ही मुलाखत 'मिर्ची प्लस' ला दिली होती. त्यावेळी उर्वशीनं सांगितलं की सुष्मिता सेननं 2012 मध्ये मिस यूनिव्हर्स इंडियामध्ये विजेत्याच्या स्पर्धेतून बाहेर जाण्यास सांगितलं होतं. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प मिस युनिव्हर्सचे ऑर्गनाइजर होते. त्यावेळी प्रोडक्शन आणि सुष्मिता सेनची कंपनी भारतातू स्पर्धेक शोधत होते कारण फेमिना मिस इंडियानं या स्पर्धेत न जाण्याचा निर्णय घेतला होता. घटनेविषयी विचारण्यात आलं तर उर्वशीनं सांगितलं की तिला वयाची मर्यादा माहित नव्हती.
उर्वशीनं पुढे म्हटलं की, जेव्हा मी 2012 मध्ये पहिल्यांदा मिस यूनिवर्स इंडिया जिंकली होती, तेव्हा मिस यूनिवर्ससाठी वयाचं एक बंधन होतं. आमचे बॉस डोनाल्ड ट्रम्प होते. तर त्याचं वयाचं बंधन हे 18 वर्ष होतं, इतकंच नाही तर मला देखील माहित नव्हतं की जिंकल्यानंतर मी 17 वर्षांची झाले. मी वयाचीजी मर्यादा होती त्यापेक्षा फक्त 24 दिवस कमी होते. वयाच्या कारणामुळे सुष्मितानं सरळं तिला तिचं क्राऊन देण्यास सांगितलं आणि म्हणाली की उर्वशी, तू जाऊ शकत नाही.
हेही वाचा : दिलजीत दोसांझच्या लग्नाच्या चर्चांमध्ये निशा बानोची पोस्ट, म्हणाली 'मी पत्नी आहे पण...'
उर्वशीनं 2015 मध्ये झालेल्या मिस डिव्हा आयोजित मिस यूनिव्हर्स इंडिया या स्पर्धेत पुन्हा एकदा भाग घेतला आणि तिनं ती स्पर्धा पास देखील केली. उर्वशीनं ते दिवस आठवत सांगितलं की जेव्हा तिनं ऑडिशनसाठी एन्ट्री केली आणि सांगितलं की कसं तिथल्या स्पर्धकांनी विचार केला की ती तिथे एक स्पर्धक नाही तर परिक्षक म्हणून आली आहे. तिनं सांगितलं की तिथे असलेल्या कोणाचीही इच्छा नव्हती की तिनं स्पर्धेत भाग घ्यावा. तेव्हा उर्वशीला ती एकटं असल्याचं जाणवलं असं तिनं सांगितलं.