नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि तिच्या मोठ्या मुलीचे काही फोटोज सोशल मीडियावर दिसून आले. या फोटोत दोन्ही पण अतिशय खुश दिसत आहेत. कारणही तसेच होते. सुष्मिताच्या मोठ्या मुलीचा वाढदिवस होता. आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की, सुष्मिताने काही वर्षांपूर्वीच दोन मुलींना दत्तक घेतले आहे आणि त्यातील एक मुलगी १८ वर्षांची झाली आहे. आपल्या मुलीच्या वाढदिवसाचे काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेयर केले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुष्मिता सिंगल पॅरेन्ट असून ती मुलींची पालनपोषण नीट करते. सुष्मिताने वयाच्या २५ व्या वर्षीच मुलीला दत्तक घेतले होते. आज ती ४१ वर्षांची आहे. परंतु, तिने अजूनही लग्न केलेले नाही. 



२००० मध्ये तिने रैनी ला दत्तक घेतले आणि त्यानंतर २०१० मध्ये तिने अलीशा या अजून एका मुलीचे पालकत्व स्वीकारले. ती आपल्या मुलींसोबत वेळ घालवते आणि त्या संबंधित फोटोज देखील सोशल मीडियावर शेयर करते.