मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहे. सुष्मिता तिच्या दोन दत्तक मुलींसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. सुष्मिताच्या मुलींच नाव रेने आणि अलीशा आहे. सुष्मिता कायम मुलींसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता सुष्मिता एका वेगळ्या कराणामुळे चर्चेत आली आहे. सुष्मिता आज यशस्वी आहे. पण तिने कधी लग्न केलं नाही. सुष्मिताने एका मुलाखतीत लग्न न करण्याचं कारण देखील सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुष्मिताच्या अविवाहित राहण्यामागे तिच्या मुली नसल्याचं वक्तव्य खुद्द अभिनेत्रीने केलं आहे. सुष्मिता म्हणाली, 'मी तीनदा लग्न करण्याच्या विचारात होते. पण तीन वेळा मला देवाने वाचवलं. त्यांच्या आयुष्यात काय अडचणी होत्या मी तुम्हाला सांगू शकत नाही. देव माझ्या दोन मुलींचं रक्षण करत आहेत.'



दरम्यान, सुष्मिता सेनने काही महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप केल. मात्र, दोघांमधील मैत्री अजूनही कायम आहे. जेव्हा अभिनेत्रीने ब्रेकअपची बातमी सोशल मीडियावर शेअर केली तेव्हाही तिने मोठ्या आदराने त्यांचे नाते संपुष्टात आणल्याचं चाहत्यांना सांगितलं.