मुंबई : माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी लग्न केल्याची चर्चा काहि दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रंगली होती. या चर्चेचं कारण होतं ललित मोदी यांची पोस्ट,  ललित मोदी यांनी सुष्मिताला डेट करत असल्याचे स्पष्टीकरण सोशल मीडिया पोस्टव्दारे दिलं होतं. ललित मोदींच्या या स्पष्टीकरणानंतर सुष्मिता सेननेही पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, 'मी आनंदी ठिकाणी आहे... ना लग्न झालंय, ना एंगेजमेंट. जे माझ्यावर बिनशर्त प्रेम करतात त्यांच्यासोबत मी आहे. अशा आशयाची एक पोस्ट शेअर केली होती.
 
सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या अफेअरच्या बातम्या सतत चर्चेत असतात. दोघांनीही आपलं प्रेम सार्वजनिक केलं आहे. अशा परिस्थितीत सुष्मिता सेन तिच्या चाहत्यांसाठी पोस्ट शेअर करत अपडेट देत असते. याचा पुरावा म्हणजे अभिनेत्रीचा हा लेटेस्ट व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये सुष्मिता सेन घराच्या बाल्कनीत बसून गाणं ऐकताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये सुष्मिता सेनच्या मागे वाजत असलेलं गाणं अभिनेत्री एन्जॉय करताना दिसत आहे. यावेळी ती झोपाळ्यावर बसलेली दिसत आहे.  अभिनेत्रीच्या या व्हिडिओच्या पार्श्वभूमीत 'ओरे मनवा तू तो बावरा है. हे गाणं वाजत आहे. या व्हिडिओमध्ये सुष्मिता सेन फ्लाइंग किसही करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेत्रीने झोपाळ्याजवळ एक मेणबत्ती पेटवली आहे आणि ती या  सगळ्याचा आनंद घेताना दिसत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सुष्मिता सेन ललित मोदीसोबतचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. त्यामुळे ती सतत चर्चेत असते. या दोघांचं नातं आता सर्वांसमोर आलं आहे. ललित मोदी 58 वर्षांचे आहेत तर सुष्मिता सेन 46 वर्षांची आहे, म्हणजेच दोघांमध्ये 12 वर्षांचा फरक आहे. पण तरीही सुष्मिता सेन ललित मोदींच्या प्रेमात आहे.