Sushmita Sen RampWalk : लॅक्मे फॅशन वीकच्या तिसर्‍या दिवशी (Lakme Fashion Week) सगळयांना आश्चर्याचा धक्का बसला. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेननं (Sushmita Sen) यावेळी हजेरी लावली होती. सुष्मिता काही दिवसांपूर्वीच मृत्यूच्या दारातून परत आली आहे. अशात तिनं रॅम्पवॉक करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वी सुष्मिताला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यातून बाहेर आली असून ती आता फिट झाली आहे. इतकंच काय तर सुष्मितानं डिझायनर अनुश्री रेड्डीसाठी रॅम्पवॉक केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॅकमे फॅशन वीकच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सुष्मिताचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. लाईट पिवळा रंगाचा लेहेंगा आणि मिनिमल दागिन्यांमध्ये सुष्मितानं रॅम्पवॉक केला आहे. तिनं तिचे केस मोकळे सोडले आणि कपाळावर छोटी टिकली लावली आहे. या शिवाय तिच्या हातात एक बुके देखील होता जो तिने शेवटी उभा असलेल्या फोटोग्राफर्सना दिला. यावेळी रॅम्पवॉक करताना सुष्मिताच्या चेहऱ्यावर असलेले हे सुंदर हास्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या आणि तिच्यासाठी चिअर्स केलं आहे. सुष्मितानं इतका स्ट्रॉंग कमबॅक केल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला आहे. (Sushmita Sen RampWalk) 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : मी येतीये! Gautami Patil च्या पोस्टची एकच चर्चा, बैलाच्या वाढदिवशी होणार कल्ला


सुश्मिताच्या या कमबॅक नंतर तिचे चाहते मात्र जास्तच उत्साहित झाले आहेत. तिचे फॅन्स या पोस्ट खाली कॉमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करताना दिसतायत. सुष्मिताचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, तिच्या जीवनात असाच आनंद असू दे. दुसरा म्हणाला, तिची स्माईल खूप सुंदर आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, ती शक्ती आहे... ती देवी आहे! आणखी एक नेटकरी म्हणाला, हिची औरा मला खूप आवडतो. 


सुष्मिताला आला होता हृदयविकाराच्या झटका 


2 मार्च रोजी सुष्मिताला हृदयविकाराच्या झटका आल्याची  बातमी समोल आली होता. त्यानंतर दोन दिवसांनी. तिची अँजिओप्लास्टी करण्यात आली. तिचा या घटनेबद्दल तिने गुप्तता राखली होती मात्र  घरी परतल्यावर सुष्मिताने स्वतः याबाबत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत खुलासा केला, "मला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला... अँजिओप्लास्टी झाली... आणि हृदयाविषयी अनेक खुलासे केले आहेत.