Sushmita Sen's Taali Teaser : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून लांब असली तरी देखील ती ओटीटीच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला येते. तिची आर्या ही वेब सीरिज चांगलीच गाजली. तर गेल्या काही दिवसांपासून तिच्या ताली या वेब सीरिजची देखील चर्चा सुरु होती. तिच्या या आगामी सीरिजचा टीझर सध्या प्रदर्शित झाला आहे. या वेब सीरिजमध्ये सुष्मिता ही तृतीयपंथीच्या भूमिकेत दिसणार आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे वेब सीरिजच्या टीझरमध्ये... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तालीच्या वेब सीरिजमध्ये सुष्मिता ही तृतीयपंथीच्या भूमिकेत दिसत आहे. या वेब सीरिजमध्ये सुष्मिता सेन ही अॅक्टिव्हिस गौरी सावंतच्या भूमिकेत दिसणार आहे. या टीझरमध्ये ती हुबेहुबे गौरी सावंत सारखी दिसत आहे. तिच्या दमदार अभिनयानं जणूकाही आपण गौरी सावंत यांना पाहत आहोत असं दिसत आहे. हा टीझर 46 सेकंदाचा आहे. या टीझरमध्ये गौरी सावंतला खऱ्या आयुष्यात काय काय सहन करावं लागलं त्याची एक झलक पाहायला मिळत आहे. तर थोडक्यात तिचा संघर्ष आपल्याला यात पाहायला मिळतोय. टीझरमध्ये सुष्मिता बोलताना दिसते की 'मी गौरी. जिला कोणी किन्नर म्हणतं, तर कोणी सोशल वर्कर, कोणी नौटंकी बोलत, तर कोणी गेम चेंजर. हे कथानक त्याच प्रवासावर आहे. शिवीगाळ ते टाळी पर्यंतचा प्रवास. जे लोक त्याचं खरं स्वरूप दाखवण्यास घाबरतात. ते कधीच जिंकत नाही बाबू, स्वाभमान, संन्मान आणि स्वातंत्र्य या तिनही गोष्टी मला पाहिजेत.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कोण आहे गौरी सावंत?


गौरी सावंत ही एक तृतीयपंथी असून तिनं आयुष्यात खूप मोठा संघर्ष केला आहे. गौरी सावंतला आज अनेक मालिका आणि अवॉर्ड फंक्शनमध्ये बोलावण्यात येतं. पण तिनं आयुष्यात अनेक अडथळे पाहिले आहेत. गौरीचा जन्म एका मराठा कुटुंबात झाला असून तिचं आधीचं नाव गणेश नंदन असं होतं. तिचे वडील एसीपी होते. पण तिच्या सेक्शुएलिटीला पाहता गौरीला तिचं घर सोडावं लागलं होतं. 


हेही वाचा : 'त्याने मागून माझे ब्रेस्ट पकडले', Sonam Kapoor सांगितला अंगावर शहारे आणणारा 'तो' प्रसंग


या वेबसीरिजचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. तर वेब सीरिजचे लेखक हे क्षितीज पटवर्धन आहेत. एकूण 6 एपिसोडची असलेली ही वेबसीरिज 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. ही सीरिज तुम्ही जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. तर पुढच्या आठवड्यात जिथे प्रेक्षक 'गदर 2' आणि 'ओएमजी 2' पाहतील. तर दुसरीकडे त्यांच्याकडे 'ताली' ही सीरिज ओटीटीवर उपलब्ध असणार आहे.