नवी दिल्ली : बॉलिवूडची ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असते. ती अभिनेत्री म्हणजे सुश्मिता सेन.  अलीकडेच तिने सोशल मीडियावर काही फोटोज शेअर केले. या फोटोत तिचा चेहरा दिसत नसला तरी एब्स दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याच महिन्यात तिचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त तिला अपेक्षित असलेली शरीरयष्टी मिळण्यात ती यशस्वी झाली आहे. त्याचा फोटो शेअर करत तिने लिहिले की, "हळू हळू का होईना पण मला अपेक्षित असलेली शरीरयष्टी मी माझ्या ४२ व्या वाढदिवसानिमित्त नक्की मिळवेन. यासाठी सोपा मार्ग आहे तो म्हणजे मेहनत करणे. माझे शरीर आणि माझे नियम."



१९ नोव्हेंबरला असलेल्या वाढदिवसाठी ती परफेक्ट बॉडीचे गिफ्ट स्वतःला देऊ इच्छिते आणि त्यासाठी ती प्रचंड मेहनत घेत आहे. तिच्या मुलींसोबतचे फोटोज देखील ती सोशल मीडियावर शेअर करत असते.