एक्स बॉयफ्रेंड रोहमनसोबत Sushmita Sen चं पॅचअप? `त्या` सिझलिंग फोटोमुळे एकच चर्चा
Sushmita Sen with ex boyfriend Rohman Shawl : सुष्मिता सेननं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचा एक्स-बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर केला आहे. त्यानंतर रोहमननं देखील हा फोटो शेअर केला. हे पाहता त्या दोघांच्या पॅच-अप झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Sushmita Sen with ex boyfriend Rohman Shawl : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमी चर्चेत असते. सुष्मिता ही चित्रपटात दिसत नसली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. सुष्मिता तिच्या खासगी आयुष्यामुळे बऱ्याचवेळा चर्चेत असते. एका अवॉर्ड शोदरम्यान, सुष्मिता तिच्या एक्स बॉयफ्रेंड रोहमनसोबत दिसली होती. त्यानंतर सुष्मिता आणि रोहमनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता त्या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर रोहमन आणि सुष्मिताचा पॅच-अप झाला अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. इतकंच काय तर सुष्मिता नक्की रोहमनला डेट करते की ललित मोदीला असा सवाल देखील अनेकांना पडला आहे.
सुष्मिता सेननं नुकतीच हिन्दुस्तान टाइम्सच्या मोस्ट स्टायलिश अवॉर्ड या कार्यक्रमात दिसली होती. या कार्यक्रमातील तिचा लूक हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या कार्यक्रमातील सुष्मिताचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या कार्यक्रमात सुष्मितासोबत तिची लेक अलीशा आणि एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल देखील होते. तिघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सुष्मितानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून रोहमनसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यावर रोहमननं स्लटी कमेंट केली होती. त्यावरून सुष्मिता आणि रोहमनचा पॅचअप झाल्याचं म्हटले जात आहे.
रोहमनसोबतचा फोटो शेअर करत सुष्मिता म्हणाली, रोहमन खूप चांगला फोटो आहे. त्यासोबत सुष्मितानं लिप्सचं ईमोटीकॉन वापरलं आहे. तर दुसरीकडे रोहमननं हा फोटो शेअर करत Right Back At You असं म्हणतं त्यानं देखील हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी सुष्मिता सेन आणि रोहमनच्या ब्रेकअपची बातमी समोर आली होती. त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या ब्रेकअपची माहिती दिली होती. यानंतर सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्या डेटिंगच्या चर्चा चांगल्याच सुरु झाल्या होत्या. पण आता पुन्हा एकदा सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांच्यातील जवळीक वाढू लागली आहे. हे पाहता त्यांचा पॅचअप झालं असे काहींचे म्हणणे आहे.
हेही वाचा : The Kerala Story मुळे नेटफ्लिक्सवरील 'ही' वेब सीरिज चर्चेत! नक्की काय आहे साम्य तुम्हाला माहितीये का?
दरम्यान, सुष्मिताच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, सुष्मिता लवकरच ‘आर्य 3’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. सुष्मितानं या वेब सीरिजच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. या सीरिजच्या दोन सीझननं सगळ्यांना खिळवून ठेवलं होतं. तर ही सीरिज तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.