मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen)  तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सुष्मिता तिच्या आणि व्यावसायिक ललित मोदींच्या (Sushmita Sen and Lalit Modi Relationship) रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. त्यानंतर त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता अलीकडेच सुष्मिता तिची मोठी लेक रेनी आणि एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत (Rohman Shawl) दिसली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुष्मिता आणि रोहमन बराच वेळ रिलेशनशिपमध्ये होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर दोघं बऱ्याचवेळा एकत्र दिसले. रोहमन आणि सुष्मिताच्या दोन्ही मुली रेने आणि अलिशा हे खूप चांगलं बॉन्ड आहे. सुष्मितासोबत ब्रेकअप झाल्यानंतरही रेने आणि अलिशा यांच्या बॉन्डमध्ये काही बदल नाही झाला. 


आणखी वाचा : मानधनाच्या बाबतीत अल्लू अर्जुननं 'किंग' शाहरुखलाही टाकलं मागे; 'पुष्पा 2' साठी घेतोय 'इतकं' मानधन


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आता सोशल मीडियावर सुष्मिता, तिची मुलगी आणि रोहमनचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक विचारत आहेत की ललित मोदी कुठे आहेत? सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'या नात्याला काय म्हणतात?' दुसरा नेटकरी म्हणाला,' 'ललित भाईचं काय?' तिसरा नेटकरी म्हणाला,'रोहमन नोटिस पिरियडवर असल्याचं दिसतंय.' आणखी एक नेटकरी म्हणाला की 'ललित मोदी बघताय ना?'


सुष्मितानं अजून मोदींसोबतच्या तिच्या रिलेशनशिपवर दुजोरा दिला नाही. दोघेही एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करताना दिसतात. सुष्मिता सगळ्यात शेवटी 'आर्या 2' मध्ये दिसली. ही सीरिज गेल्या वर्षी प्रदर्शित झाली होती.