मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेनचा  'ताली' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रवी जाधव या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.  हा  सिनेमा ट्रान्सजेंडर समुदायाच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेत्री गौरी शिंदे या कार्यकर्त्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपुर्वी तिला हृद्यविकाराचा झटका आला होता. याबाबत आता एका अभिनेत्याने मोठा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुष्मिता सेनला काही दिवसांपुर्वी हृद्यविकाराचा झटका आला होता. ही बातमी ऐकून अनेकांना धक्का बसला होता. सोशल मीडियावर सुश्मिताने या बाबतची एक पोस्ट शेअर करत या संबधितची माहिती तिच्या चाहत्यांना दिली होती. अवघ्या काही वेलातच तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यानंतर तिला तिच्या चाहत्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. आता अभिनेता विकास कुमारने सुश्मिताबाबत वक्तव्य केलं आहे. त्याने खुलासा करत सुष्मिताला कधी हृदयविकाराचा झटका आला होता. हे सांगितलं आहे.
 
''सुष्मिता डिस्ने प्लस हॉटस्टारच्या वेब शो 'आर्या'च्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगसाठी जयपूर राजस्थानमध्ये होती तेव्हा तिला हृदयविकाराचा झटका आला होता.'' मात्र २ मार्चला तिने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली होती. 


यापुढे तो म्हणाला, सुष्मिताला हार्ट अटॅक आला होता हे देखील तिथे कोणाला माहित नव्हतं. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले असता तेव्हा सगळ्यांना समजंल की, हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आर्याच्या टीमला तिच्या तब्येतीबद्दल काहीच माहिती नव्हती जेव्हा तिने इंस्टाग्रामवर खुलासा केला तेव्हा सगळ्यांना आणि आम्हाला देखील तेव्हाच समजलं समजलं.'' असं एका मुलाखती दरम्यान विकास कुमार म्हणाला. 


याबाबत सुष्मिता म्हणाली की, मी एक स्टार आहे, त्यामुळे माझ्या तब्येतीबद्दल मला व्यक्त व्हायचं नव्हतं. असा खुलासा तिने नंतर केला. आर्या या वेब सिरीजमध्ये  विकास कुमार एसीपी खानची भूमिका साकारत आहे.


सुष्मिता सेनने तिच्या सोशल मीडियावर  पोस्ट शेअर करत तिची अँजिओप्लास्टी करण्यात आली ही माहिती दिली आणि तिच्या गरजेच्या वेळी तिच्या पाठीशी उभे राहिलेल्यांचे तिने आभार मानले. सुष्मिताने ही पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली होती. सुष्मिता सेनने तिच्या चाहत्यांसाठी इंस्टाग्राम लाइव्ह देखील केलं. यावेळी तिने तिचे कुटुंबीय, डॉक्टर आणि तिच्या पाठीशी उभे असलेल्या लोकांचे आभार मानले.