`गोल्ड डिगर` आणि लालची म्हणणाऱ्या ट्रोलर्सवर सुष्मिता सेनचा राग अनावर; पोस्ट शेअर करत म्हणाली...
अलीकडेच बॉलिवूडची सुपरस्टार सुष्मिता सेन आणि प्रसिद्ध बिझनेसमन ललित मोदी यांच्या नात्याच्या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे
मुंबई : अलीकडेच बॉलिवूडची सुपरस्टार सुष्मिता सेन आणि प्रसिद्ध बिझनेसमन ललित मोदी यांच्या नात्याच्या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यानंतर सुष्मिता सेनलाही सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जात आहे. दरम्यान, सुष्मिता सेनने स्वत:ला गोल्ड डिगर म्हणवून घेणाऱ्या पोस्टद्वारे ट्रोलरवर आपला राग काढला आहे.
सुष्मिता सेन भडकसी ट्रोलरर्सवर
सुष्मिता सेनचं नाव गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे कारण तिने ललित मोदींना त्यांच्या संपत्तीमुळे डेट केलं आहे. असं ट्रोलर्सचं म्हणणं आहे. यावर सुष्मिता सेनने आता तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर करत एक लांबलचक नोट लिहिली आहे. या पोस्टमध्ये सुष्मिताने लिहिलं आहे की, ''माझं नावं, गोल्ड डिगर, संपत्तीची लोभी असं संबोधून माझं नाव सोशल मीडियावर खूप फेकलं जात होतं.
माझ्यावर जोरदार टीका होत आहे. पण मला या टीकाकारांची अजिबात पर्वा नाही. माझ्याकडे हिऱ्यांची चाचणी घेण्याची क्षमता आहे. सोन्याची नाही. अशा स्थितीत काही बुद्धीमान लोकांच्या माध्यमातून गोल्ड डिग म्हणून मला हिणवणे ही यामध्ये त्यांची खालची मानसिकता स्पष्टपणे दिसून येते. या क्षुल्लक लोकांव्यतिरिक्त मला माझ्या हितचिंतकांचा आणि कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा आहे. कारण मी सूर्यासारखी आहे जी त्यांच्या अस्तित्वासाठी आणि विवेकासाठी सदैव चमकत राहिन.
सुष्मिता ललित मोदीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे
खरंतर, काही दिवसांपूर्वी माजी आयपीएल कमिशनर ललित मोदी यांनी सोशल मीडियावर स्वतःचं आणि सुष्मिता सेनचे काही फोटो शेअर करत ते एकमेकांना डेट करत असल्याची माहिती दिली होती. याशिवाय ललितने असंही सांगितलं आहे की, आगामी काळात तो सुष्मिता सेनसोबतही लग्नही करणार आहे.