मुंबई : माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी एकमेकांना डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. ललित मोदींनी फोटो ट्विट केल्यानंतर डेट करत असल्याची माहिती दिली होती. या ट्विटनंतर आता सोशल मीडियावर त्या दोघांच्या नात्यांची चर्चा सुरु झालीय. एवढंच नाही तर दोघींना ट्रेलींगचा सामना देखील करावा लागला. शिवाय दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सुष्मिताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान  व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सुष्मिता स्विमिंग सूटमध्ये दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुष्मिता सेनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री यॉटमधून खाली उतरताना आणि स्विमिंग करताना दिसत आहे. सुष्मिता सेनने व्हिडीओ इन्स्टाग्रामवर कॅप्शनसह शेअर केला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अभिनेत्रीने हा व्हिडिओ शेअर करताच बॉयफ्रेंड ललित मोदीने त्यावर कमेंट केली आहे. सुष्मिताच्या व्हिडीओवर ललित मोदीने 'सार्डिनियामध्ये हॉट दिसत आहेस...' अशी कमेंट केली आहे. 


ललित मोदीच्या कमेंटवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. सध्या सुष्मिता सेनचा व्हिडीओ ललित मोदीने केलेल्या कमेंटमुळे चर्चेत आला आहे. सध्या सर्वांच्या नजरा सुष्मिताच्या व्हिडीओवर आहे.