मुंबई : बॉलिवूडसाठी २०२२ हे  वर्ष फारसं काही चांगलं नव्हतं. अनेक मोठे सिनेमा फ्लॉपवर फ्लॉप गेले. २०२२ मध्ये अनेक सेलिब्रिटींची लग्न झाली तर काहीजणांची ब्रेकअप झाले. तर काहिंनी घटस्फोट घेत त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला. अशातचं २०२२ मध्ये सगळ्यात जास्त कोणती बॉलिवूड अभिनेत्री चर्चेत होती तर ती म्हणजे, सुष्मिता सेन. या अभिनेत्रीच्या रिलेशनशिपच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामनुळे चर्चेत असणारी सुष्मिता यावेळी मात्र एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. १९९४ साली मिस युनिवर्स का किताब जिंकला. अभिनेत्रीने एका पेक्षा एक सिनेमात काम करुन प्रेक्षकांची मने जिंकली. ही अभिनेत्री बराच काळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहीली असली तरी 'आर्या' या वेबसीरिजद्वारे तिने अभिनयाच्या दुनियेत दणक्यात पुनरागमन केलं. 
मात्र आज आम्ही तुम्हाला सुष्मिता सेनशी संबंधित अनेक एक असा किस्सा सांगणार आहोत. जो ऐकून तुम्हाला धक्का बसेल. 


अभिनेत्री एकदा महेश भट्ट यांच्यामुळे ढसाढसा रडली होती. यामागचं कारण म्हणजे, सुष्मिताने महेश भट्ट यांच्या 'दस्तक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पदार्पणाच्या निमित्ताने या अभिनेत्रीने आपल्या मनात अनेक स्वप्नं सजवली होती. पण अभिनेत्रीसोबत असं काही घडलं, ज्याचा तिने कधी विचारही केला नव्हता. काही काळापूर्वी सुष्मिताने ट्विंकल खन्नाला एक मुलाखत दिली होती, ज्यामध्ये तिने याचा खुलासा केला होता.


सुष्मिताने सांगितलं की, यापूर्वी तिने अभिनय कौशल्याच्या कमतरतेमुळे हा चित्रपट नाकारला होता. मात्र, कसं-बसं महेश भट्ट यांनी तिची समजूत काढली. आणि सुष्मिताला या सिनेमासाठी तयार केलं. या सिनेमातील एका सीनमध्ये सुष्मिताला तिचे कानातले काढून कोणावर तरी फेकून द्यायचे होते. मात्र अभिनेत्रीला हे जमतंच नव्हतं. तिच्या या सीनवर महेश भट्ट खूप संतापले होते


महेश भट्ट  सगळ्यांसमोर सुष्मितावर खूप चिडले. हे पाहून सुष्मिता सेन रडू लागली आणि म्हणाली की, तुम्ही माझ्याशी असं बोलू शकत नाही. सुष्मिता सेनला असं रागावलेलं पाहून महेश भट्ट म्हणाले की, त्यांना फक्त कॅमेरावर सुद्धा असाच राग हवा आहे. यानंतर सुष्मिताने हा सीन पुन्हा शूट केला आणि यावेळी हा सीनही ओके झाला.


यानंतर सुष्मिता सेनलाही समजलं की महेश भट्ट यांना केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक का म्हटलं जात. यानंतर सुष्मिता सेनने महेश भट्ट दिग्दर्शित दस्तक या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यानंतर सुष्मिता सेनने बॉलीवूडमधील एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये आपला अभिनय दाखवला.