VIDEO Sushmita Sen : रॅम्पवर सुष्मिता सेनचा ड्रेस पायात अडकला त्यानंतर...
Sushmita Sen Viral Video : 21 मे 1994 मध्ये सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सुष्मितासाठी मिस युनिव्हर्सचा मुकुट मिळवं इतकं सोपं नव्हतं. रॅम्पवर सुष्मिताचा ड्रेस पायात अडकला अन् मग...
Sushmita Sen Viral Video : मिस युनिव्हर्स (Miss Universe) आणि बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood actress) सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. तिचा तो मधुर आवाजापासून ते मोठ्या पडद्यावरच्या अभिनयापर्यंत सगळ्यांनाच तिने वेड लावलं आहे. आजही तिची फॅन फॉलोइंग कोटींच्या घरात आहे. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा सुष्मिता सेन मिस युनिव्हर्सचा (Sushmita Sen Miss Universe) किताब जिंकण्याच्या स्पर्धेत सहभागी झाली होती. तेव्हा स्टेजवर तिने आपल्या उत्तरांनी सर्वांना प्रभावित केलं होतं. सुष्मिता म्हणाली की, प्रेम ही भारतीयांसाठी जीवनाची सर्वात मोठी संपत्ती आहे. कारण इथे सर्व धर्माचे लोक राहतात. प्रत्येकाला बंधुभावाने राहायला आवडतं आणि हाच त्यांच्या जीवनाचा मूळ मंत्र आहे. त्याचा या उत्तरानंतर जगाभरातून तिने वाहवाह मिळवली. सध्या तिचा एक जुना व्हिडीओ (video viral ) सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे.
आई ती आई असते!
सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेल्या व्हिडीओमध्ये सुष्मिता सेन (Sushmita Sen old viral video) काळा रंगाच्या गाऊनमध्ये रॅम्पवॉक (Sushmita Sen Rampwalk video) उभी आहे. अशातच तिचा ड्रेस पायात अडकतो. तो ती काढण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात तिथे एक काळा रंगाच्या साडीत महिला येतं आणि सुष्मिता सेनची मदत करते. ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून लेकीला अडचणीत पाहून आईने स्टेजवर धाव घेतली असते. आईचं हे प्रेम पाहून सुष्मितालाही भरून येतं आणि तिला आईला हृदयाचा जवळ घेते. (Sushmita Sens dress got stuck on the ramp than Mother helped Sushmita old viral video on social media)
मिस इंडियाचा ड्रेसही असा डिझाइन झाला...
आज कोट्यावधींच्या संपत्तीची मालकी असलेल्या सुष्मिताकडे मिस इंडियासाठी सहभागी झाली तेव्हा पैसे नव्हते. त्यामुळे सुष्मिताकडे स्टेजवर जाण्यासाठी डिझायनर कपडे नव्हते. या स्पर्धेसाठी सुष्मिताला 4 कॉस्ट्यूम्सची गरज होती. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सुष्मिताला तिच्या आईने अशावेळी एक मोलाचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या की, लोक तुझे कपडे बघायला येत नाही आहे तर तुला बघायला येतं आहेत. त्यानंतर या मायलेकी सरोजनी नगर मार्केटमध्ये गेला आणि त्यानंतर घराखाली गॅरेजमध्ये पेटीकोट शिवणारा एक माणूस होता. त्याचाकडे कपडे दिले आणि सांगितलं हा ड्रेस टीव्हीवर येणार आहे तर छान बनवा. त्यावेळी त्या व्यक्तीने माझा Winning gown तयार केला होता.
आईने तयार केलं फुल
अभिनेत्री सांगते की, या गाऊनसाठी आईने उरलेल्या कपड्यापासून एक फूल बनवलं होतं. त्याशिवाय ब्रँड न्यू सॉक्स विकत आणले त्याला इलास्टिक लावले आणि सुष्मितासाठी गल्वस बनवले. त्यामुळे सुष्मितासाठी तिची आई आणि तो ड्रेससोबत मिस इंडियाचा (Sushmita Sen Miss India) किताब मिळवणे हा एक मोठा दिवस होता.