मुंबई:सिनेस्टार नेहमीच स्वतःचे अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना देत असतात. प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनसुद्धा सोशल मीडियावर  अपडेट राहून दैनंदिन जीवनातील घडामोडी तिच्या चाहत्यांना कळवत असते. सुष्मिता सेन तितक्याच उत्साहाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घडामोडींची माहिती सोशल मीडियावर अपडेट करत असते. सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रॉमन यांच्यातील नाते सध्या तिच्या चाहत्यांसाठी महत्वाचा विषय ठरला आहे. शनिवारी सुष्मिता व्यायाम करताना व्हिडिओ शेअर केला.तिने या व्हिडिओमध्ये चाहत्यांना फिट राहण्याचे आवाहन केले.43 वर्षांची असून सुध्दा ती चाळीशी वाटत नाही.त्यामुळे तिच्या आणि 15 वर्ष लहान बॉयफ्रेंडच्या वयात फारसे अंतर दिसत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 




आता सध्या सुष्मिता सेनचा अंदाज काही निराळाच आहे. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनच्या फिटनेस फंड्याने चाहते आकर्षक झाले आहे.काही दिवसांपूर्वी सुष्मिताने व्हिडिओ व्हायरल केला होता त्यात रॉमन त्याच्या कुटुंबीयांसोबत होता.सुष्मिता आता चंदेरी दुनियेमध्ये पुन्हा पुनरागमन कधी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सुष्मिता लवकरच एका नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मध्य प्रदेशमधील एका गुन्हेगारीवर आधारित हे नाटक आहे. ज्यामध्ये सुष्मिता एक कठोर पोलिसाची भूमिका साकारणार आहे.