Sussanne Khan ला बॉयफ्रेंड कसा वागवतोय पाहून हृतिकही थक्क; Video Viral
घटस्फोटानंतर सुझानचा प्रत्येक क्षण बॉयफ्रेंडसोबत....हे नातं हृतिकही पाहतच राहिल, Video Viral
Sussanne Khan with Boyfriend : घटस्फोटानंतर अभिनेता हृतिक रोशन अभिनेत्री सबा आजादला डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. तर दुसरीकडे हृतिकची पहिली पत्नी सुझान खान (sussanne khan) अभिनता अर्सलान गोलीला (arslan goni) डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. एवढंच नाही तर, मध्यंतरी सबा आणि हृतिक लवकरचं लग्न करणार असल्याचं समोर आले. याच दरम्यान सुझान आणि बॉयफ्रेंड अर्सनालचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रविवारी अभिनेता कृष्ण कुमारने त्याच्या घरी दिवाळी पार्टी ठेवली. या पार्टीत बॉलिवूडचे (Diwali party) अनेक स्टार्स सहभागी झाले होते. याठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. व्हिडीओमध्ये अर्सलानची काळजी घेतना दिसत आहे. एवढंच नाही तर, सर्वांसमोर दोघांनी एकमेकांनी किस देखील केलं. (sussanne khan hot dress)
व्हिडीओमध्ये सुझान खान आणि अर्सलान गोनी रोज एकमेकांचा हात धरताना दिसतात. कपल पापाराझींच्या कॅमेऱ्यासमोर एकमेकांच्या प्रेमात पडताना दिसले, ज्याची खूप चर्चा होत आहे.
महत्त्वाचं म्हणजे, दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केलेला नाही. आम्ही दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहोत असं... एका मुलाखतीत सुझानने सांगितलं. (ssanne khan arslan goni dating)
अभिनेता हृतिक रोशन (hrithik roshan) आणि सुझान खान जेव्हा विभक्त झाले, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. आज सुझान आणि हृतिक वेगळे राहत असले तरी ते दोघे मुलांचं योग्य पद्धतीने सांभाळ करतात. सुझान आणि हृतिक मुलांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी परदेशात जातात. (sussanne khan and hrithik roshan)
पण जवळपास 17 वर्षांचं नातं संपवत दोघांनी घटस्फोट घेण्याचा टोकाचा निर्णय घेतला. हृतिकनंतर सुझान खानच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. सुझानच्या मनावर राज्य करणाऱ्या त्या व्यक्तीचं नाव अर्सलान गोनी (Arslan Goni) आहे.