दक्षता ठसाळे, झी मीडिया, मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता सुयश टिळक याचा साखरपुडा झाला आहे. आपल्या होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवसादिवशी सुयशने ही खास घोषणा केली आहे. सुयशने इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत ही माहिती ऑफिशिअल शेअर केली आहे. (Suyash Tilak gets engaged with Aayushi Bhave ) सुयशने आपल्या साखरपुड्याची ऑफिशिअल अनाऊन्समेंट देखील आजच्याच दिवशी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुयश टिळकने अभिनेत्री आयुषी भावेसोबत साखरपुडा केला आहे. आज आयुषीचा वाढदिवस आहे. सुयशने तिच्या वाढदिवसादिवशी खास पोस्ट शेअर केली आहे. 


सुयशची खास इंस्टाग्राम पोस्ट 


सुयशने आपल्या इंस्टाग्राममध्ये लिहिलं आहे की,'माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सुंदर बनवणारी स्त्री. हॅप्पी बर्थ डे लव....आणि त्याने ही पोस्ट आयुषी भावेला टॅग केली आहे. तुझ्याबरोबर माझं आयुष्य पूर्ण झालं आहे आणि मी खूप भाग्यवान कारण माझ्याकडे तुझ्यासारखी सुंदर जीवनसाथी मिळाली..


सांगण्यास आनंद होतोय, आम्ही ऑफिशिअली एंगेज झालोय. आपल्या सर्व प्रियजनांच्या आशीर्वादाने व प्रेमाने आम्ही एकत्र नवीन प्रवास सुरू करतोय. ज्यांनी आमचा हा क्षण अतिशय खास बनवला त्या सगळ्या मित्रपरिवाराचे आणि कुटुंबियांचे मनापासून आभार



जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच सुयश टिळकने साखरपुडा केला आहे. साऊथ इंडियन अटायरमध्ये या सोहळ्याचे खास फोटो दोघांनी शेअर केले आहेत. सुयशने एक सुंदर फोटो शेअर करत आयुषीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


'मी हो म्हणाले',आयुषी भावेची खास पोस्ट


आयुषीने देखील खास फोटो पोस्ट केले आहेत. त्याचबरोबर अतिशय सुंदर कॅप्शन लिहिलं आहे. तो म्हणाला,'हॅप्पी बर्थ डे' आणि मी 'हो' म्हटलं.



आयुषीने यावेळी दोन फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोत तिने सुयशचं उपरणं पकडून खास पोझ दिली आहे. तर दुसऱ्या फोटोत सुयशने तिला छान साथ दिली आहे. सुयशच्या साखरपुड्याचे हे खास क्षण फोटोग्राफर पराग सावंतने क्लिक केले आहेत.