नवी दिल्ली : 'बिग बॉस'मधलं वादग्रस्त व्यक्तीमत्व ठरलेल्या ओम स्वामी पुन्हा एकदा वादात पडलेत. यावेळी, मात्र वाद बडबडीपुरता मर्यादीत न राहता हाणामारीवर येऊन ठेपला... आणि स्वामीजींना सार्वजनिक ठिकाणी फटकेही खावे लागले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना मंगळवारी दिल्लीतील जंतर-मंतरवर घडली. अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर याचा विरोध म्हणून नॅशनल पँथर पार्टी आंदोलन करत होती. इथं ओम स्वामी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आपला सहकारी मुकेश जैनसोबत दाखल झाले. 


परंतु, आंदोलनकर्त्या काही महिलांनी मात्र स्वामीजींना उघडपणे विरोध केला. वाद वाढला तेव्हा एका महिलेनं स्वामीजींना एक कानाखालीही ठेवून दिली. यावेळी, मुकेश जैन यानं मध्यस्थी करताना एका महिलेवर हात उचलला. तेव्हा मात्र आंदोलनकर्त्यांचा पारा भलताच चढला आणि त्यांनी ओम स्वामी - मुकेश जैन यांची यथेच्छ धुलाई केली. 


काही वेळानं पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मोठ्या प्रयत्नानंतर स्वामीजींना आंदोलनकर्त्यांपासून वाचवलं.