स्वप्निल जोशीच्या भिकारी सिनेमाचं म्यूझिक लॉन्च
भिकारी या फिल्मचं म्युझिक लॉन्च मुंबईत पार पडलं. डिरेक्टर रोहित शेट्टी, तुषार कपूर, बॉबी देवोल, श्रेयस तळपदे आदी गोलमाल अगेनचे टीम मेंबर्स या म्युझिक लॉन्चला आवर्जून उपस्थित होते. गणेश आचार्य दिग्दर्शित या फिल्ममध्ये स्वप्नील जोशी, ऋचा इनामदार ही जोडी पहायला मिळणार आहे.
मुंबई : भिकारी या फिल्मचं म्युझिक लॉन्च मुंबईत पार पडलं. डिरेक्टर रोहित शेट्टी, तुषार कपूर, बॉबी देवोल, श्रेयस तळपदे आदी गोलमाल अगेनचे टीम मेंबर्स या म्युझिक लॉन्चला आवर्जून उपस्थित होते. गणेश आचार्य दिग्दर्शित या फिल्ममध्ये स्वप्नील जोशी, ऋचा इनामदार ही जोडी पहायला मिळणार आहे.
स्वतः गणेश आचार्यच कोरिओग्राफर असल्याने फिल्ममधली गाणी हेच या सिनेमाचं खास वैशिष्ट्य असणार आहे. नेहमी रोमॅण्टिक रोलमध्ये दिसणारा स्वप्नील जोशी या फिल्ममध्ये मात्र एका वेगळ्या आव्हानात्मक भूमिकेत दिसतो आहे. एकूणच म्युझिक लॉन्चला हजेरी लावलेल्या बॉलिवूडच्या मंडळींनीही फिल्ममधल्या गाण्यांचं आणि फिल्मच्या कथेचं कौतुक केलं आहे.
सिनेमातली गाणी हा जसा सिनेमाचा प्लस पॉईन्ट आहे, तशाच प्रकारे सिनेमाची कथा प्रत्येकाला विचार करायला लावणारी असल्याचं स्वप्नीलने म्हटलंय. सिनेमात रोमॅण्टिकपणा आहेच, पण त्याचबरोबर एक वैचारिक थरार देखील आहे, त्यामुळे प्रेक्षकांना ही फिल्म खिळवून ठेवेल असा विश्वास स्वप्नीलने व्यक्त केला आहे.
पाहा व्हिडिओ