Swara Bhaskar and Fahad Ahmad Decide to Not Get Married : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) आणि तिचा पती फहाद अहमद (Fahad Ahmad) हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. दोघांच्या लग्नाचे कार्यक्रम सुरु झाले होते. स्वरा आणि फहाद यांच्या लग्नाच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्या दोघांची एकत्र हळद झाली, ज्यात दोघांनी एकमेकांना रंग फक्त हळद नाही तर रंग देखील लावला. स्वराच्या लग्नाचे हे सगळे कार्यक्रम दिल्लीत असलेल्या आजीच्या घरी झालं होते. यात आता अशी माहिती समोर आली आहे की ते दोघं लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, 'स्वरा व फहादने कोणत्याही विशिष्ट पद्धतीने लग्न केले नाही. दोघांनी हळदी, मेहंदी, संगीत आणि रिसेप्शन यांसारखे फंक्शन्स आयोजित केले होते. त्यांचा हिंदू विवाह किंवा मुस्लीम पद्धतीने निकाह होणार नाही.” स्वरानं तिच्या लग्नाच्या या सगळ्या कार्यक्रमांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये स्वरानं मरून रंगाची साडी नेसली आहे. यासोबत तिनं मरून रंगाचं दागिने देखील परिधान केले आहेत. स्वराचा हा लूक तेलुगू नवरीप्रमाणे आहे. 



रिपोर्ट्सनुसार, असे म्हटले जात आहे की 16 मार्च रोजी ते दिल्लीत रिसेप्शन देणार आहेत. स्वरा आणि फहादनं फेब्रुवारी महिन्यात रजिस्टर मॅरेज केलं होतं. त्यानंतर दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागले होते. स्वरानं अचानक तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिच्या लग्नाची माहिती दिली होती. स्वराच्या या निर्णयानं सगळ्यांना आश्चर्यचकित झाले होते. तिच्या या निर्णयानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. 


हेही वाचा : VIDEO : मराठमोळ्या कपलचा मेजवानी बेत; बनवली 'ही' नवी रेसिपी


त्या दोघांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर, फहाद यांचा राजकीय जगाशी संबंधित आहे. स्वरा भास्कर ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. स्वरानं तिच्या करिअरची सुरुवात संजय लीला भन्साळी यांच्या गुजारिश या चित्रपटातून केली होती. मात्र, तिला खरी ओळख 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या माधवन आणि कंगनाच्या (Kangana Ranaut) 'तनु वेड्स मनू' (Tanu Weds Manu) या चित्रपटातून मिळाली.