VIDEO : मराठमोळ्या कपलचा मेजवानी बेत; बनवली 'ही' नवी रेसिपी

अभिनेत्री Khushbu Tawde नं तिच्या या नव्या रेसिपीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. खुशबूच्या या रेसिपीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला पण करायची आहे का नवी रेसिपी ट्राय!

Updated: Mar 14, 2023, 03:22 PM IST
VIDEO : मराठमोळ्या कपलचा मेजवानी बेत; बनवली 'ही' नवी रेसिपी title=

Khushbu Tawde : 'देवयानी' फेम अभिनेत्री खूशबू तावडे (Khushbu Tawde) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. खूशबू ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. खुशबू तिच्या पती आणि कुटुंबासोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिचे कुकींचे व्हिडीओ तर सोशल मीडियावर चर्चेत राहतात. आता खूशबूनं तिच्या पतीची एक खास रेसिपी शेअर केली आहे. तिनं ती रेसिपी बनवताचा व्हिडीओ शेअर केली आहे. हा व्हिडीओ सोशलर मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

खुशबूनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरू हा व्हिजीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगताना दिसत आहे. तिची ही हटके डिश सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. खुशबूनं तिचा पती संग्रामसोबत ही रेसिपी बनवली आहे. सुरुवातीला खुशबू फोडणीचा भात बनवते आणि दुसऱ्या बाजुला मॅगी बनवण्याची तयारी करते. फोडणीचा भात तयार करुन झाल्यानंतर खुशबूने त्यामध्ये तयार झालेली मॅगी मिक्स केली. आता हे पाहिल्यानंतर तुम्हालाही थोडं कसं तरी वाटलं असेल... पण तिनं खरंच असं केलं आहे. फोडणीच्या भातात मॅगी घातल्यानंतर त्या दोघांनी त्याला चाखूनही पाहिले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ शेअर तिनं त्याला कॅप्शन दिले की डिशचं नाव तुम्हाला काही सुचल्यास कमेंट करा. आम्हाला जेवण खूप आवडतं. बऱ्याचवेळा आम्हाला एकत्र जेवण बनवायला आवडतं. संग्रामला खूप चांगल्या रेसिप बनवतो आणि ते सुद्धा खूप छान! आम्हाला कसलं स्ट्रेस असलं की आम्ही जेवण बनवतो, जेवण बनवनं आमच्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. संग्रामनं इन्वेंट केलेली एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, अशा आशयाचे कॅप्शन खुशबूनं दिलं आहे. 

खुशबूचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, नक्की चांगली चव आहे का! दुसरा नेटकरी म्हणाला भातासोबत मॅगी कोण खातं. तिसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, मॅगी पुलाव बोलतात याला खूप छान लागतो. आणखी एक नेटकरी म्हणाला, मस्त लागतं आम्ही हे खाल्लं आहे. 

हेही वाचा : Sayaji Shinde यांच्यावर मधमाशांचा हल्ला!

दरम्यान, खुशबूच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तिनं तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम केलं आहे. या मालिकेत तिनं बुलबुल ही भूमिका साकारली होती. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x