स्वरा भास्करला ट्रोल करणं पडलं महागात..असं मिळालं उत्तर
सोशल मीडियावर लोकांनी तिची तुलना निरमा साबणच्या जाहिरातीत दिसणाऱ्या मुलीशी केली.
मुंबई : स्वरा भास्कर सध्या करिना, सोनम आणि शिखा तलसानियासोबत आपल्या 'वीरे दी वेडिंग' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ती सिनेमाचा प्रसार करतेय. नुकतीच ती सफेद रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. त्यानंतर लोकांनी तिची खिल्ली उडविण्यास सुरूवात केली. सोशल मीडियावर लोकांनी तिची तुलना निरमा साबणच्या जाहिरातीत दिसणाऱ्या मुलीशी केली. यासोबतच तिची खूप मस्करी करत तिच्या स्टाइल स्टेटमेंटला टार्गेट करण्यात आलं.
यानंतर स्वराने सोशल मीडियावर ट्रोलर्सना याचं उत्तर देण्याचं ठरवलं. समझदारी आणि आणि हुशारीने तिने याला उत्तर दिलं. आपल्या इंन्स्टाग्रामवर तिने व्हिडिओ शेअर केला. मानल पाहिजे, तुम्ही खूप हुशार आहात. 'मिनिस्ट्री ऑफ बॉलीवुड (ट्रोलर्स) ने तर मला लहानपणाची आठवण करुन दिली. मला लहानपणापासून वॉशिंग पावडर निरमा वाली मुलगी बनायच होतं' असं उत्तर तिने दिलं. अशाप्रकारे ट्रोल होणारी स्वरा ही काही पहिलीच अभिनेत्री नाही. स्वरासारख्या अनेक अभिनेत्रींना अनेकदा ट्रोल केलं जातं.