मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार स्वरा भास्कर आपल्या कामापेक्षा अधिक कॉन्ट्रोवर्शिअल ट्विटमुळे चर्चेत आली आहे. आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री वाईट पद्धतीने अडकले आहेत कारण त्यांनी स्वरा भास्कर विरोधात आक्षेपार्ह ट्विट केलं आहे. स्वराने ट्विटरवर केरळचे आमदार पीसी जार्जची निंदा केली. या आमदारांनी नन विरोधात चुकीचं ट्विट केलं होतं जी नन बलात्कार करणाऱ्या आरोपींच्या अटकेची मागणी करत होती. स्वराला आमदारांच वक्तव्य अजिबात आवडलं नाही. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत विवेक अग्निहोत्रीने आपल्या ट्विटरवर लिहिलं होत. स्वराच्या या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना विवेक अग्निहोत्रींचा तोल गेला आणि त्यांनी तिच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केले. ‘मीटूअंतर्गत लैंगिक शौषण आणि लैंगिक अत्याचाराविरोधात अभियान, प्लेकार्ड कुठेय? मीटूप्रॉस्ट्रिट्यूटनन’, असे ट्विट विवेक अग्निहोत्रीने केले. विवेक अग्निहोत्रीच्या या महिलांविरोधी ट्विटने स्वरा भडकली. यानंतर स्वरा आणि विवेक यांच्यात बरेच वाक्युद्ध रंगले. यापश्चात स्वराने विवेकच्या आक्षेपार्ह ट्विटविरोधात ट्विटरकडे तक्रार नोंदवली.त्या ट्विटला उत्तर देताना स्वराने देखील उत्तर दिलं. हा वाद सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.



वीरे दी वेडिंग या सिनेमातील स्वरा भास्करचा बोल्ड अंदाज खूप चर्चेत होता. स्वराचं असं म्हणणं आहे की, वेब सिरीजमध्ये सेन्सर बोर्ड नसल्यामुळे तिथे कलाकार आपलं कॅरेक्टर खूप चांगल साकारतात. तसेच स्वरा म्हणते की, आता कलाकारांना वेब सिरीजमधून खूप ऑप्शन मिळत आहेत. आणि कलाकार त्याचा देखील विचार करत आहेत.