Alia नंतर Swara Bhaskar लग्नाआधीच प्रेग्नंट? बेबी बंप व्हिडिओचा धुमाकूळ
Swara Bhaskar नं 16 फेब्रुवारी रोजी रजिस्टर मॅरेज केलं आहे. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Swara Bhaskar is Pregnant Before Getting Married : अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिनं आपला प्रियकर समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद अहमद (Swara Bhaskar and Fahad Ahmad) याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. सध्या त्या दोघांच्या तूफान चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. इतकंच काय तर ते दोघे मार्चमध्ये धुमधडाक्यात लग्न बंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे. आता या सगळ्यात स्वरा भास्करचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोला पाहून ती गर्भवती असल्याचे म्हटले जात आहे. (Swara Bhaskar is Pregnant )
स्वराचे तिच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये स्वराचं बेबी बंप दिसत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तर स्वरा तिचं बेबी बंप साडीनं लपवण्याचा प्रयत्न करते असं काहींचे म्हणणे आहे. यामुळे स्वरा आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सोशल मीडियावर कमेंट करत नेटकरी तिला ट्रोल करत आहेत तर काही नेटकरी ती प्रेग्नंट आहे हे म्हणतं आहेत. मात्र, स्वरानं या बातमीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
15 दिवसांपूर्वी स्वरानं फहादसोबतचा एक फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तो फोटो शेअर करत स्वरानं कॅप्शन देत म्हणाली की, “जन्मदिनाच्या शुभेच्छा फहद मिया. भाईचा आत्मविश्वास असाच कायम राहो. आनंदी राहा आणि असंच काम करत राहा. आता वय वाढत चाललंय, लग्न करा. तुझा वाढदिवस आणि हे संपूर्ण वर्ष तुझ्यासाठी चांगलं जाओ मित्रा.” त्यावर स्वराला उत्तर देत फहाद म्हणाला होता की “धन्यवाद जरनवाजी मैत्रिणी. भावाच्या आत्मविश्वासाने झेंडा उंचावला आहे, तो अबाधित राहणे आवश्यक आहे आणि हो, तू माझ्या लग्नाला येशील असे वचन दिले होते, त्यामुळे वेळ काढा, मला मुलगी सापडली आहे.”
हेही वाचा : 'गर्भपात आणि लगेचच शरीरसंबंध...', Rakhi Sawant चा पती आदिलबद्दल धक्कादायक खुलासा
हे पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला आता ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. हे ट्वीट पाहून नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की हे ज्या प्रकारे बोलत होते हे तर भाऊ-बहीण म्हणून वाटत आहेत. त्यावर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, “तुम्ही दोघांनी कोणता क्रॅश कोर्स केला आहे का? की मागच्या 15 दिवसांत व्हॅलेंटाईनचा परिणाम झाला तुमच्यावर?” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “तुम्ही दोघं तर एकमेकांचे भाऊ-बहीण होता ना.” तर तिसरा नेटकरी म्हणाला की, “चला तुम्ही दोघं एकमेकांना लग्नाबद्दल विचारत होता आणि आता एकमेकांशीच लग्न केलं. पण जर लग्न करायचंच होतं तर मग त्याला भाऊ का बोललीस.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “आधी भाई होता आता जान झाला.