Swara Bhasker Criticised For Meeting This Man: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर टीकेची धनी ठरत आहे. अनेकांनी स्वराच्या पतीने पोस्ट केलेला नवा फोटो पाहून तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. स्वरा भास्करने नुकतीच एका वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरुची भेट घेतली. या व्यक्तीचं नाव आहे, मौलाना शाजद नोमानी. स्वरा भास्कर पती फहाद अहमदबरोबर शनिवारी मौलाना नोमानी यांना भेटली. मात्र या भेटीनंतर अनेकांनी स्वरावर टीका केली आहे. मौलाना नोमानी यांनी काही काळापासून मुलींना शाळा, कॉलेजमध्ये पाठवणे हा पालकांसाठी 'हराम' असल्याचं विधान केलं होतं. त्यावरुनच आता अशा वादग्रस्त व्यक्तीला भेटल्याबद्दल स्वरावर टीका होत आहे.


फोटो पोस्ट करताना काय म्हटलंय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी, स्वरा भास्कर पती अहादबरोबर मौलाना नोमानींच्या भेटीसाठी गेली. फवाद यंदा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढत आहे. त्यानिमित्तानेच फवाद स्वराबरोबर मौलाना नोमानींच्या कार्यालयात त्यांना भेटण्यासाठी गेला होता. "मौलाना शाजद नोमानी यांच्या भेटीला. त्यांनी आम्हाला अनेक आशिर्वाद दिले," असं फवादने मौलानांबरोबरचे फोटो शेअर करताना म्हटलं होतं. 


फोटोंमध्ये काय आहे?


फवादने पोस्ट केलेल्या फोटोंमधील एका फोटोत तो मौलानांच्या बाजूला बासलेला दिसत आहे तर अन्य एका फोटोत फवाद आणि स्वरा मौलानांच्या आजूबाजूला उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. स्वराने या फोटोंमध्ये पेस्टल कलरचा सलवार सूट परिधान केला आहे. तिने ओढणीने आपलं डोकं झाकून घेतलं आहे. अनेकांनी महिलांच्या हक्कांबद्दल बोलणाऱ्या स्वराचं हे वागणं पटलेलं नाही. 


नक्की पाहा हा व्हिडीओ >> 'हिच ती 3 सेकंदांची Clip ज्यासाठी धानुषने मागितले 10 कोटी'; नयनताराच्या पतीची Insta स्टोरी चर्चेत



टीकेची झोड


एकीकडे महिलांच्या अधिकारांबद्दल बोलायचं आणि दुसरीकडे हे असं वागायचं असं म्हणत अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. महिलांबद्दल वादग्रस्त विधानं करणाऱ्या मौलानाला अशापद्धतीने भेटणं स्वराला भेटणं शोभणारं नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.  "अल्ट्रा फेमिनिस्ट असलेली स्वरा भास्कर देवबंद प्रो-तालिबानी फंडामेंटलिस्ट मौलाना शाजद नोमानी यांचे आशिर्वाद घेत आहे. हे तेच मौलाना आहेत जे मुलींना शिक्षण देऊ नये असं पालकांना सांगतात. शिकल्यास या मुली काफिर होतील असं या मौलानांचं म्हणणं आहे. तसेच त्यांचं अंतरधर्मीय विवाहाला (मुस्लीम मुलगी आणि हिंदू मुलगा) अशा लग्नांना नकार आहे," असं एकाने टीका करताना म्हटलं आहे. 



नवाब मलिकांविरुद्ध लढणार


दरम्यान, स्वराचा पती फवाद हा मुंबईतील अणूशक्ती नगरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिकांविरुद्ध निवडणूक लढत आहे. पूर्वी फवाद समाजवादी पार्टीत होता. मात्र पक्ष सोडून त्याने शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. स्वरा आणि फवाद यांचं 2023 मध्ये फेब्रुवारीमध्ये लग्न झालं.