Who is Fahad Ahmad: अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhasker) समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) नेते फहद अहमद (Fahad Ahmad) यांच्याशी लग्न केलं आहे. स्वराने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन एख व्हिडीओ शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये दोघांच्या कोर्ट मॅरेजसंदर्भातील कागदपत्रांची झलकही दाखवण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार दोघांनी 6 जानेवारी 2023 रोजी लग्न केलं.


कोण आहे फहद अहमद?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फहद अहमद हे समाजवादी पार्टीच्या युवा संघटनेचे महाराष्ट्र आणि मुंबई विभागाचे अध्यक्ष आहेत. फेब्रुवारी 1992 साली जन्म झालेले फहद हे मूळचे उत्तर प्रदेशमधील बरेलीचे आहेत. फहद हे स्वरापेक्षा वयाने चार वर्षांनी लहान आहेत. त्यांनी अलीगड मुस्लिम यूनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून एमफिलपर्यंतचं शिक्षण केलं. याच वेळी त्यांनी सक्रीय राजकारणामध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली. 


पीएचडीचा विद्यार्थी


'टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स'मध्ये शिकतानाच फहद अहमद हे विद्यार्थी संघाचे महासचिव म्हणून निवडून आले. त्यानंतर ते 2017 पासून 2018 पर्यंत या पदावर कार्यरत होते. सध्या फहद अहमद याच संस्थेमधून पीएचडीचा अभ्यास करत आहेत.


1000 विद्यार्थ्यांसहीत आंदोलन


फहद अहमद सन 2017-18 पहिल्यांदा त्यावेळी चर्चेत आले जेव्हा त्यांनी 'टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स'मध्ये एससी-एसटी आणि ओसीबी विद्यार्थ्यांच्या फीवाढीविरोधात आंदोलन केलं होतं. यामध्ये जवळजवळ 1000 विद्यार्थी सहभागी झाले होते. या आंदोलनाना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनीही पाठिंबा दिला होता. फहद अहमदने सीएएविरोधात मुंबईमध्येही आंदोलन केलं होतं. सीएए संविधानाच्याविरोधात असल्याचा दावा करत ऑगस्ट क्रांति मैदानात आंदोलनही केलं होतं.



प्रवेश नाकारला


फहद अहमद यांनी 'टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स'च्या पदवीदान समारंभामध्ये संस्थेचे अध्यक्ष एस. रामादुरई यांनी एमफिलची पदवी स्वीकारण्यास नकार दिला होता. यानंतर संस्थेनं या घटनेचा दाखला देत पीएचडीसाठी फहद यांना प्रवेश नाकारला होता. फहद यांचं कृत्य हे संस्थेचा अपमान करणारं होतं असंही सांगण्यात आलं होतं.


अबू आझमी कनेक्शन


फहद अहमद हे समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचे निकटवर्तीय मानले जातात. आझमी यांच्या मदतीनेच फहद समाजवादी पार्टीमध्ये सहभागी झाला. जुलै 2022 मध्ये अबू आझमी आणि रईस शेख यांच्या उपस्थित फहदने अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता. यानंतर त्यांना युथ विंगचं पदाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं.