मुंबई : रायगडावर भवानी बाईंच्या लग्नाचे सनई चौघडे वाजत आहेत. पण एकीकडे बुऱ्हाणपुरात शंभूराजे वाघाच्या गुहेत शिरून वाघाचा म्हणजे औरंगजेबाचा वध करायला निघाले आहेत. पहिल्या अयशस्वी प्रयत्नानंतर त्यांनी कोणत्याही परिस्तिथीत माघार घ्यायची नाही हा निर्णय घेतला आहे. रायगडावर मात्र येसूबाईंच्या जीवाला घोर लागलाय कारण शंभूराज्यांचं रायगडावर नसणं गुपित ठेऊन लग्नाचे सगळे विधी नीट पार पडायचे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शंभूराज्यांनी सुद्धा भवानी बाईंना तुमच्या वरातीचा मेणा आम्हीच उचलणार हा शब्द दिला आहे. आणि त्याच दिवशी शंभूराजे आणि औरंगजेब समोरासमोर येणार आहेत. शंभूराजे औरंगजेबाचा वध करणार का? भवानी बाईंना दिलेलं वचन शंभूराजे तोडणार का?  येसूबाई शंभूराज्यांचं हे गुपित गुपित ठेऊ शकणार का..? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील स्वराज्य रक्षक संभाजीच्या महाएपिसोड मध्ये मिळणार आहे. महाएपिसोड हा 27 ऑक्टोबर रोजी रात्री 9 ते 10 या विशेष 1 तासात दाखवण्यात येणार आहे. 


स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेने प्रत्येकाच्या मनात घर निर्माण केलं आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तीरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत.  शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम या मालिकेतून होत आहे. मालिकेतील सगळीच पात्र म्हणजे इतिहासातील एक अजरामर पान आहे.