मुंबई : स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचा संघर्ष लवकरचं मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. सिनेमाचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला. सिनेमाचं नाव  'स्वातंत्र वीर सावरकर' असं आहे. सिनेमात सावरकरांच्या भूमिकेत अभिनेता रणदीप हुड्डा झळकणार आहे. फर्स्ट लुकमध्ये सावरकरांच्या भूमिकेत रणदीप आहे... हे ओळणंही प्रेक्षकांसाठी कठीण आहे. कारण अभिनेता हुबेहूब सावरकरांप्रमाणे दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फर्स्ट लूकमध्ये रणदीपने सावरकरांसारखी काळी टोपी आणि चष्मा घातलेला आहे. स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्या 139 व्या जयंतीनिमित्त सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.


प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सिनेमाचं शूटिंग ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार आहे. सिनेमात रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. 



'स्वातंत्र वीर सावरकर'  सिनेमाची निर्मिती संदीप सिंग आणि आनंद पंडित यांनी केली आहे, तर सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या खांद्यावर आहे.


या ठिकाणी होणार सिनेमाचं शुटिंग 
लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार बेटांवर वेगवेगळ्या ठिकाणी सिनेमाचं  चित्रीकरण होणार आहे. सध्या सर्वत्र सिनेमाचा फर्स्ट लूक व्हायरल होत आहे.