मुंबई : स्टँडअप कॉमेडी शोचं तरुणांमध्ये वाढणार क्रेझ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. सध्या कॉमेडियन स्वाती सचदेवचा कॉमेडी शो 'लव्ह इज लव' तुफान चर्चात आहे. नुकताचं प्रसारित झालेल्या एका व्हिडीओमध्ये तिने स्वतःला आपण Bisexua असल्याची घोषणा केली. स्वाती शोमध्ये म्हणाली, 'आय एम Bisexual...., तर मागे बसलेला एक व्यक्ती माझ्याकडे एक टक पाहत राहीला..' असं स्वाती म्हणाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढंच नाही तर स्वातीने तिला आलेल्या एका मेसेजबद्दल देखील सांगितलं, 'मला चाहते अनेक मेसेज पाठवतात... एकाने मला तुम्ही इच्छाधारी आहात...' असा मेसेज पाठवला. सध्या स्वातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 



या व्हिडीओबद्दल एका मुलाखतीत 'ही कल्पना तुझीचं होती, की व्हिडीओसाठी होती?' असा प्रश्न स्वातीला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, 'मी या विषयावर गंभीर आहे. माझ्यासाठी विनोद कायम अव्वल स्थानी आहे.  हा विषय नंतर येतो म्हणूनच मला वाटले की मी या विषयावर चांगला परफॉर्मन्स देऊ शकेन.' 


त्यानंतर स्वातीला, 'तु  Bisexual आहेस हे आई वडिलांना माहित आहे का?' असा प्रश्न विचारला यावर ती म्हणाली, 'व्हिडीओ पाहून त्यांना कळालेलं नाही, त्यांना मी पूर्वीच माझा निर्णय सांगितला आहे..' असं देखील स्वाती म्हणाली. 


दरम्यान, स्वाती सचदेव ही 1992 मध्ये पंजाबमध्ये जन्मलेली स्टँड अप कॉमेडियन आहे. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्याने अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी, नोएडा येथून जाहिरात आणि मार्केटिंगचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती स्वतःच्या 'लव्ह इज लव' कॉमेडी शोमुळे चर्चेत असते.