मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देत आहे. तिचा नुकताच प्रदर्शित झालेला 'रश्मी रॉकेट' हा चित्रपट चांगलाच यशस्वी झाला असला तरी तिचे अनेक चित्रपट रिलीज होण्याच्या तयारीत आहेत. तापसीच्या आगामी चित्रपटांच्या यादीत 'ब्लर' हा सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे. हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तापसीच्या डोळ्यावर पट्टी बांधली  
तापसी पन्नू प्रत्येक चित्रपटात तिच्या पात्राच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि यावेळीही तिने असंच काहीसं केलं आहे. एका रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने या चित्रपटासाठी खूप विचित्र पद्धतीने तयारी केली आहे. पात्र तयार करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी तापसी पन्नू 12 तास डोळ्यांवर पट्टी बांधून राहिली होती.


पात्र अनुभवण्याचा प्रयत्न करा
मिळालेल्या माहितीनुसार, तापसी पन्नूला तिचं पात्र जवळून अनुभवायचं होतं. त्यामुळेच तिने दिवसभर डोळ्यांवर पट्टी बांधून राहण्याचा निर्णय घेतला. सकाळी ७ वाजता उठल्याबरोबर तिने डोळ्यांवर पट्टी बांधली आणि दिवसभर असंच आपलं सामान्य जीवन सुरू ठेवलं. तिने फक्त डोळ्यावर पट्टी बांधली पण दिनक्रम बदलला नाही.



तापसी पन्नूने दिवसभरात काय केलं?
तिच्या दिवसात फोन कॉल्स अटेंड करणं, नाश्ता करणं, जेवण करणं, क्रूशी बोलणं आणि लोकांना भेटणं असं होतं. या सगळ्या गोष्टी तिने डोळ्यावर पट्टी बांधून केल्या. असं मानलं जातं की, तापसी पन्नूचा आगामी चित्रपट एक मनोरंजन ब्लॉकबस्टर तसंच सामाजिक संदेश देणारा चित्रपट असेल. याचं दिग्दर्शन अजय बहल करत आहेत.