मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू पुन्हा एकदा खेळाडूच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बेबी', 'नाम शबाना' यांसारख्या चित्रपटातून अॅक्शन आणि 'सूरमा' चित्रपटातून हॉकीपटूची भूमिका साकारणारी तापसी आता एका धावपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. तापसीच्या आगामी 'रश्मि रॉकेट' या चित्रपटाची झलक समोर आली आहे. या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'रश्मि रॉकेट' हा चित्रपट गुजरातच्या कच्छमधील धावपटू रश्मि हिच्यावर आधारित आहे.


या मोशन पोस्टरमध्ये तापसी रेसिंग ट्रॅकवर धावताना दिसत आहे. तापसीच्या या लूकला प्रेक्षकांची पसंतीही मिळताना दिसतेय.




तापसी 'रश्मि रॉकेट' या चित्रपटासह तिच्या आगामी 'सांड की आँख' चित्रपटातही खेळाडूची भूमिका साकारत आहे. 'सांड की आँख' दोन वयस्कर शार्प शूटर महिलांची कहाणी आहे. या चित्रपटात तापसीसह भूमि पेडणेकरही भूमिका साकारणार आहे.