मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी चित्रपट रश्मी रॉकेटमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला, ज्यात ती एका खेळाडूच्या भूमिकेत दिसत आहे. तापसीचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. अलीकडेच तापसी तिच्या शरीरामुळे ट्रोल झाली होती. आता तिने ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रश्मी रॉकेट चित्रपटात एका क्रीडापटूची भूमिका साकारण्यासाठी तापसीने आपल्या बॉडीवर विशेष मेहनत घेतली आहे.  काही काळापासून अभिनेत्रीला तिच्या शारीरिक बदलासाठी ट्रोल केले जात होते. पण आता तिने ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
सोशल मीडियावर अनेक लोक तिला ट्रान्सजेंडर म्हणत होते.



त्याला प्रत्युत्तर देताना तापसीने ट्वीट केले, "मनापासून धन्यवाद, पण अनेक स्त्रिया आहेत ज्यांना प्रत्यक्षात रोज हे सर्व ऐकावे लागते त्यांच्या कोणत्याही दोषाशिवाय. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या ट्विटवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत." रश्मी रॉकेट 15 ऑक्टोबर 2021 रोजी रिलीज होईल.