Taapsee Pannu On Anant Ambani Radhika Merchant Wedding: बॉलिवूडमधले अनेक नामवंत कलाकार, परदेशी पाहुणे, राजेशाही थाट असा सर्व मोहोल मागील काही दिवसांपासून मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील जीओ वर्ल्ड येथे दिसत होता तो अनंत अंबानी-राधिका मर्चंड यांच्या विवाहसोहळ्यानिमित्त! या सोहळ्याला जवळपास संपूर्ण बॉलिवूड अवतरलं होतं, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. मात्र या सोहळ्याकडे पाठ फिरवणाऱ्या किंवा आवर्जून गैरहजर राहणाऱ्यांमध्ये अभिनेत्री तापसी पन्नूचाही समावेश होता. ती या लग्नाला का आली नाही याबद्दल तिनेच खुलासा केला आहे. 


अनेक नामवंत सेलिब्रिटींची उपस्थिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आपल्या धाकट्या लेकाच्या लग्नाला कसलीही कमतरता ठेवलेली नव्हती. अगदी ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यापासून ते गायक जस्टीन बिबरपर्यंत आणि डब्ल्यूडब्ल्यूई सुपर स्टार जॉन सीनापासून फिफाच्या प्रमुखापर्यंत अनेकांना अंबानी कुटुंबाने मुंबईतील जीओ वर्ल्ड येथे पार पडलेल्या शाही विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित केलं होतं. परदेशी पाहुण्यांबरोबरच बॉलिवूड, क्रिडा क्षेत्रातील दिग्गजांबरोबर राजकारण्यांनी या लग्नाला आवर्जून हजेरी लावली. सलमान खान, शाहरुख खान, रणवीर-दीपिका, रणबीर-आलिया, रजनिकांत, बच्चन कुटुंबीयांसहीत अनेक नामवंत कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंड्याबरोबरच बरेच आजी-माजी क्रिकेटपटूही या कार्यक्रमाला हजर होते. असं असतानाच तापसीसारखे काही कलाकार या सोहळ्यात दिसेल नाहीत.


तापसीने हसत दिलं उत्तर...


अंबानींच्या लग्नसोहळ्याबद्दल विचारलं असता तापसीने एका मुलाखतीमध्ये दरम्यान आधी मनसोक्त हसून घेतल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. आपण या लग्नसोहळ्यामधील कोणत्याही कार्यक्रमाला गेलो नाही आणि जाणार नाही, असं तापसीने सांगितलं. तसेच पुढे बोलताना तापसीने आपल्याला अशाच लग्नाला जायला आवडतं जिथे लग्न घरातील व्यक्ती आणि पाहुण्यांमध्ये काही संवाद होतो, असंही ही 'थप्पड' फेम अभिनेत्री म्हणाली.


मी अशा लग्नांना जाते जिथे...


"मी त्यांना वैयक्तिक स्तरावर ओळखत नाही. मला वाटतं की लग्न ही फार खासगी गोष्ट असते. मला खात्री आहे त्यांचे अनेक मित्र-मैत्रिणी असती. मात्र मी अशाच लग्ननांना जाते जिथे किमान ज्या घरी लग्न आहे त्यांचं आणि पाहुण्याचं काहीतरी बोलणं होतं, संवाद साधला जातो," असं तापसीने सांगितलं.


अंबानी कुटुंब लंडनला रवाना


दरम्यान, मुंबईमधील लग्न सोहळा उरकल्यानंतर अंबानी कुटुंबीय लग्न सोहळ्यातील शेवटच्या काही कार्यक्रमांसाठी लंडन गेल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मार्च महिन्यामध्ये गुजरातमधील जामनगर येथे या विवाहसोहळ्यापूर्वीचा पहिला कार्यक्रम पार पडला होता. तेव्हापासून जवळपास चार महिन्यांच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या सोहळ्यातील कार्यक्रम पार पडले.