मुंबई : भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार आणि लोकप्रिय महिला क्रिकेटर मिताली राज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. मितालीचा जन्म 3 डिसेंबर 1982 साली जोधपुरमध्ये झाला. तिच्या वाढदिवसादिवशी एक खास घोषणा करण्यात आली. तिच्या जीवनावर एक सिनेमा बनवला जात आहे. या सिनेमाचं नाव 'शाबास मिठू'. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सि



नेमात मितालीची भूमिका अभिनेत्री तापसी पन्नू साकारत आहे. राहुल ढोलकिया या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. राहुलने शाहरूख खानच्या 'रईस' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तापसी पन्नूने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून 'हॅप्पी हॅप्पी बर्थ डे कॅप्टन मिताली राज' असा मॅसेज लिहिला आहे. तुम्ही आम्हाला अनेकदा अभिमान वाटावा अशी गोष्ट केली आहे. ही स्वतःला भाग्यवान समजते की, मला ऑनस्क्रिन तुमची भूमिका साकारायला मिळत आहे. तुमच्या वाढदिवसादिवशी मी तुम्हाला काय गिफ्ट देऊ हे मला कळत नाही. पण मी खूप मेहनत करून ही भूमिका साकारेन. तुम्हाला ऑनस्क्रिन पाहून अभिमान वाटेल अशी मी भूमिका साकारेन.



 तापसीने मितालीसोबत काही फोटो शेअर केले आहेत. मिताली टी 20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती घेत आहे. पण मिताली टेस्ट आणि वनडे इंटरनॅशनल टीमची कर्णधार आहे. महिला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मितालीच्या नावे सर्वात जास्त धावांची नोंद आहे. तिला महिला क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर म्हटलं जातं.