मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये रोशन कौर सोढी हे पात्र साकारलेली अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. तिची लहान बहिण व्हेंटिलेटरवर जन्म मृत्यूच्या लढा देत आहे. अशातच तिची बहिणीची देखभाल करण्यासाठी तिला घरी जावं लागलं आहे. अशावेळी तिच्याकडे कोणतंच काम नाहीये. जाणून घेवूया की, या अभिनेत्रीचं काय म्हणणं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अडचणीत आहे तारक मेहतामधील जेनिफर
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार,  'तारक मेहता' फेम जेनिफर तिच्या पर्सनल आयुष्यात कठीण काळाचा सामना करत आहे. अभिनेत्रीने सांगितलं की, माझ्या लहान बहिणीचा हालत खूप खराब आहे. ती खूप सिरीयस आहे. यासाठी मी माझ्या घरी आले आहे. सध्या ती व्हेंटिलेटरवर आहे आणि यावेळी तिला सगळ्यात जास्त माझी गरज आहे. सध्या तिची हालत गंभीर आहे. सध्या ती जीवन आणि मृत्यूचा लढा देत आहे.  अशा परिस्थितीत मला तिच्यासोबत रहायचं आहे.
 
गेले दीड वर्ष गेलं दुखात
अभिनेत्रीने सांगितलं की, गेल्या दीड वर्षात ती तिचं आयुष्य खूप वाईट परिस्थीतीत घालवत आहे. माझ्या लहान भावाच्या मृत्यूनंतर मी माझ्या आई-वडिलांच्या घरातील सात मुलींचा सांभाळ करत आहे. याच दरम्यान असित मोदीवाला मॅटर झाला. सगळ्या गोष्टी एकत्र मॅनेज करणं माझ्यासाठी खूप कठिण होत्या. यासाठी गेले काही महिने माझ्यासाठी खूप टेन्शनचे होते.
 
जेनिफरने असं देखील सांगितलं की, तारक मेहता सोडल्यानंतर, आत्तापर्यंत तिला कोणताच रोल ऑफर केला गेला नाही. पण एक प्रोडक्शन हाऊस आहे. जो माझ्यासारख्या पात्राच्या शोधात आहे. कदाचित ती लोकं शोसाठी मला अप्रोच करतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, काहीवेळा आधी जेनिफरने तारक मेहताच्या निर्मात्याच्या विरोधात सेक्शुअल हैरेसमेंटची केस जिंकली होती. न्यायालयाने असित मोदी यांना ५ लाख रुपये नुकसा भरपाई देण्यास सांगितलं आहे, मात्र अद्याप तीर तिला नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही.


अभिनेत्रीने सांगितलं की, ५ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी 17 एप्रिलपर्यंत थांबायला सांगितलं आहे. याशिवाय तिला असित मोदींकडून ठरलेली रक्कमही घ्यायची आहे. जी जवळपास 25 लाख रुपये इतकी आहे. आशा आहे की, लवकरच जेनिफरवरची सगळी संकट संपतील.