मुंबई : मुंबईची आमभाषा ही हिंदी असल्याच्या वक्तव्यावरून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashma ) ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली. या मालिकेतील चंपक चाचा यांच्या तोंडून मुंबईची भाषा ही हिंदी असल्याचं विधान करण्यात आलं होतं. यावरून मनेसेने आक्रमक पवित्रा घेतला होता. याबाबत मालिकेकडून एक नवा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओतून माफी मागण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालिकेत काम करणारे मेहता लाल यांची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी माफी मागितली आहे. मित्रों एक विशेष बात म्हणत ते म्हणतात की,'भारताची आर्थिक राजधानी ही महाराष्ट्रातील शहर असलेली मुंबई आहे. येथील स्थानिक आणि प्रचलित भाषा मराठी आहे. मुंबईने नेहमी सर्वांना सामावून घेतलंय.  सर्व भाषांचा सन्मान केलाय. मात्र चंपक चाचांनी केलेल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांची आम्ही अंतःकरणापासून माफी मागतो.' (चूक झाली....! 'तारक मेहता...'मधील 'बापूजीं'नी मागितली माफी) 


 



हा व्हिडिओ 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या अधिकृत फेसबूक पेजवर शेअर करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या सर्व प्रकरणी 'तारक मेहता....'चा तीव्र शब्दांत विरोध करण्यात आला. मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदी असणाऱ्या अमेय खोपकर यांनी 'हेच ते मराठीचे मारक मेहता', असं लिहित एका ट्विटर पोस्टमधून संताप व्यक्त केला. मालिकेतील एका दृश्यावरुन आणि संवादावरुन होणारा हाच विरोध पाहता मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनीही याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं.