Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ही मालिका गेल्या 16 वर्षांपासून टीव्हीवर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतून अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली आहे. अशातच आता या मालिकेतून अनेक कलाकार वेगवेगळ्या कारणाने मालिकेचा निरोप घेताना दिसत आहेत. 'तारक मेहता का उलटा चश्मा' ही मालिका टीव्हीवरील सर्वात जास्त काळ चालणारी मालिका आहे. ही मालिका सुरुवातीपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तारक मेहता'मधील 'या' अभिनेत्याने मालिका सोडली? 


'तारक मेहता का उलटा चश्मा' या मालिकेतून अनेक कलाकार निरोप घेताना दिसत आहेत. मात्र, अलीकडेच या मालिकेतील काही कलाकार ही मालिका सोडत असल्याच्या बातम्या देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. नुकतेच काही दिवसांआधी अब्दुल उर्फ शरद सांकला यांनी या अफवा फेटाळून लावल्या होत्या. आता देखील या मालिकेतील आत्माराम भिडे उर्फ मंदार चांदवडकर हे मालिका सोडत असल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. मात्र, स्वत: अभिनेत्याने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


मंदार चांदवडकर याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने 'तारक मेहता का उलटा चश्मा' ही मालिका सोडत असल्याची उफवा पसरवली जात असल्याचं म्हटलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

काय म्हणाले मंदार चांदवडकर? 


नमस्कार प्रेक्षक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडीओ फक्त सेलिब्रेशनचा नाही तर मला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचे आहे. ज्याने माझे लक्ष वेधून घेतले आहे. बऱ्याच लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असेल, या व्हिडीओच्या थंबनेलमध्ये लिहिले आहे, गोलीला काढून टाकली आहे. आज मी 'तारक मेहता का उलटा चश्मा' सेटची संपूर्ण सत्यता सांगेन. दया भाभी येणार नाहीत. मी पण शो सोडेन. लोक सोशल मीडियाचा कसा गैरवापर करतात हे दाखवणारा असा व्हिडीओ पाहून मला आश्चर्य आणि दु: ख देखील झाले आहे. तुम्ही व्हिडीओमध्ये पहात असलेली छायाचित्रे लाइव स्ट्रीममधील आहेत. जी मी शोला 16 वर्षे पूर्ण झाल्यावर केली होती. 


मंदार याने त्याच्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, मित्रांनो, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. अशा अफवा पसरवू नका. 'तारक मेहता का उलटा चश्मा' ही मालिका 2008 पासून तुम्हा सर्वांचे मनोरंजन करत आहे. येत्या काही वर्षांमध्ये देखील ही मालिका अशीच सुरु राहील. हेच मला सांगायचे होते म्हणून मी हा व्हिडीओ शेअर केला आहे. खूप खूप धन्यवाद.