`जेठालाल`ला मिळतं सर्वाधिक मानधन, सर्वात कमी फी कोणाला माहितीये?
`तारक मेहता का उल्टा चष्मा` हा एक असा शो आहे. जो त्याच्या एपिसोडपासून ते त्याच्या पात्रांपर्यंत खूप चर्चेत असतो.
मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा एक असा शो आहे. जो त्याच्या एपिसोडपासून ते त्याच्या पात्रांपर्यंत खूप चर्चेत असतो. प्रेक्षकांना शो संबंधित प्रत्येक छोट्या मोठ्या बातम्या माहित असतात. विशेषतः, या शोमधील कलाकारांची फी किती आहे. याबद्दल चाहत्यांची उत्सुकता कायम असते. शोमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्याबद्दल बोलताना, आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल अनेक वेळा सांगितलं आहे. जेठालालची भूमिका साकारणारा दिलीप जोशी हा शोचा सर्वात जास्त फी घेणारा कलाकार आहे.
जेठालाल एका एपिसोडसाठी इतके लाख घेतो
दिलीप जोशी गेल्या 13 वर्षांपासून शोमध्ये जेठालालची भूमिका साकारत आहे. आणि त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना देखील खूप आवडते. यामुळेच त्याला शोमध्ये सर्वाधिक फी मिळते. दिलीप जोशी एका एपिसोडसाठी दीड लाख रुपये घेतो. अशा प्रकारे दिलीप जोशी महिन्याला लाखो रुपये कमावतात. या शोच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकाची ही चर्चा होती, पण जर आपण सर्वात कमी फी घेणाऱ्या पात्राबद्दल आपण बोललो तर त्याचं नाव जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
टप्पूला सर्वात कमी फी मिळते
मीडिया रिपोर्टनुसार जिथे जेठालालला शोमध्ये सर्वात जास्त फी आहे, तिथे सर्वात कमी फी त्याचा ऑन-स्क्रीन मुलगा टप्पूला म्हणजेच राज अनाडकटला आहे. हे नाव जाणून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेलच. पण हे खरं आहे. राज अनादकत खूप दिवसांनंतर शो मध्ये सामील झाला, त्यामुळे त्याची फी बाकी कलाकारांपेक्षा खूपच कमी आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याला प्रत्येक एपिसोडसाठी 10-15 हजार रुपये मिळतात. टप्पूला सगळ्या कलाकारांपेक्षा खूपच कमी फी मिळते.
तारक मेहतामधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता
शोमध्ये तारक मेहताच्या भूमिकेत दिसणारा शैलेश लोढा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. तो एका एपिसोडसाठी 1 लाख रुपये घेतो आणि या भूमिकेत त्याला खूप पसंत केलं जात.