TMKOC : Taarak Mehta... मालिकेतून बाहेर पडलेल्या दयाबेनची ही काय अवस्था? Video Viral
Disha Vakani चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून... तिच्या चाहत्यांना तिची खूप चिंता वाटत आहे.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Viral Video : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेतील अनेक कलाकारांनी शोला रामराम केला. या सगळ्यात नवीन कलाकारांना मालिकेत काम करण्याची संधी मिळत आहे. दरम्यान, सगळ्या चाहत्यांना फक्त दया बेनला (Daya Ben) पुन्हा एकदा शोमध्ये पाहायचे आहे.
दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीचा (Disha Vakani) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिशा एका मुलाला तिच्या मांडीवर घेऊन बसून तिची वेदनादायक कहाणी सांगत आहे. ते मुल सतत रडत आहे आणि दिशाला अश्रू अनावर होतात. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दयाबेनची अवस्था पाहून लोक भावूक होत आहेत. दयाबेनचे अश्रू नेटकऱ्यांनाही रडायला भाग पाडत आहेत. दिशाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी तिला विचारत आहेत की हे मूल कोण आहे आणि दयाबेनची अशी अवस्था कोणी केली.
हेही वाचा : Amrish Puri यांचा नातू कामासाठी वणवण भटकतोय; कोण म्हणतं इथं वशिल्यानं कामं होतात?
दरम्यान, दयाबेनचा हा व्हिडीओ 2008 मध्ये आलेल्या 'के कंपनी' चित्रपटाचा आहे. या चित्रपटात तुषार कपूर आणि अनुपम खेर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात तुषारनं पत्रकाराची भूमिका साकारली होती. चित्रपटात तुषार हा दिशा वकानीची ही भयावह कहाणी जगासमोर मांडण्याच्या प्रयत्न करतो.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील अनेक कलाकारांनी या मालिकेत काम करण्याआधी चित्रपटात, नाटकात, मालिका, जाहिराती आणि म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले होते.
दिशा वकाणी करणार मालिकेत एण्ट्री?
दिशा वकाणीनेही चित्रपटांमध्ये काम केले होते. चित्रपटसृष्टीत जागा मिळवण्यासाठी दिशानं अनेक प्रयत्न केले. दिशानं जोधा अकबर या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात दिशानं ऐश्वर्या रायच्या दासीची भूमिका साकारली होती. चित्रपटात दिशानं ऐश्वर्या आणि हृतिक रोशनसोबत काम केले. मात्र, तिला खरं यश हे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतून मिळाली. दरम्यान, 2017 साली प्रेग्नंसीमुळे दिशानं मालिका सोडली होती. नुकतंच तिनं एका मुलाला जन्म दिला आहे. तेव्हा पासून दिशा मालिकेत आता परतणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.