टप्पूसोबतच्या अफेअरच्या चर्चेनंतर `तारक मेहता` फेम बबीताकडून प्रेमाची कबुली?
पण व्हिडिओमध्ये तिने वेगळंच नाव घेतलं आहे.
मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा टेलिव्हिजनवरील लोकांचा आवडता कॉमेडी शो आहे. लोकांना या शोचा प्रत्येक स्टार खूप आवडतो. तसंच या मालिकेतील प्रत्येक पात्राचं स्वत:चं फॅन फॉलोविंग आहे.
प्रत्येकाने स्वत:चा मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. बबिताची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता नेहमीच आपल्या दमदार अभिनयाने सर्वाच लक्षवेधून घेते. मुनमुन दत्ता वैयक्तिक आयुष्यामुळे ही बऱ्याचदा चर्चेत दिसून येते. आता तिने आपले प्रेम व्यक्त केले आहे.
मुनमुन दत्ताचे प्रेम
मुनमुन दत्ताने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये ती कोणावर सर्वात जास्त प्रेम करते हे सांगितले आहे आणि तिने पहिल्यांदाच बिनधास्तपणे प्रतिक्रिया दिली आहे.पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे नाव ना टप्पूचे आहे ना जेठालालचे. मग मुनमुन दत्ता शेवटी कोणाच्या प्रेमात पडते?
खरंतर काही दिवसांपासून बबिता आणि टप्पू हे दोघेही डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. बऱ्याचदा दोघेही सोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. आणि एकत्र वेळ देखील घालवताना दिसतात. त्यामुळे अनेकांना वाटतं होते की बबिता टप्पूचे नाव घेणार की काय? पण व्हिडिओमध्ये तिने वेगळंच नाव घेतलं आहे.
मुनमुनचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये मुनमुन दत्ताला विचारण्यात आले की, तू प्रेमात आहेस का? यावर मुनमुन दत्ता म्हणते की, मी स्वतःच्या प्रेमात आहे.
या व्हिडिओतील अभिनेत्रीची स्टाईल अनेकांना आवडली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. पण तिने अद्याप तिच्या रिलेशनशीप स्टेटस बाबत कोणाताही खुलासा न केल्याने चाहते ही काहीसे नाराज झाले आहेत.