`तारक मेहता`मधील हा लोकप्रिय अभिनेता कोरोना पॉझिटिव्ह
देशभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाला आहे.
मुंबई : देशभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाला आहे. आता कोरोनाच्या जाळ्यात चित्रपटसृष्टी आणि टीव्हीचे कलाकारही पकडीत येऊ लागले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका बातमीनुसार, छोट्या पडद्यावरचा सर्वाधिक आवडता शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' देखील कोरानाच्या तिसऱ्या लाटेचं सावट आहे.
या शोमध्ये बाघाची भूमिका साकारणारा तन्मय वेकारिया कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून, त्यानंतर चाहत्यांची चिंता वाढली आहे. बाघाने अलीकडेच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आल्यानंतर चाहते खूप चिंतेत आहेत आणि त्याला स्वतःची काळजी घ्यायला सांगत आहेत.
पोस्ट शेअर करून चाहत्यांना केलं आवाहन
पोस्ट शेअर करताना तिने लिहिलं, 'सर्वांना नमस्कार... सर्व खबरदारी घेऊनही मला कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत गेल्या २-३ दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे. कृपया स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्या.. तुम्ही सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. त्यांनी या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'कृपया काळजी घ्या आणि सुरक्षित रहा, बाहेर जाणं टाळा, खूप महत्वाचं आहे...'
जेठालाल शोमध्ये दिसत नाही
विशेष म्हणजे यावेळी जेठालाल वगळता इतर सर्व कलाकार या शोमध्ये दिसत आहेत. वास्तविक, अलीकडेच दिलीप जोशी यांच्या मुलीचं लग्न झालं, त्यामुळे ते शोमधून गायब आहेत. मात्र, आता बाघा कोविड-19 च्या विळख्यात आल्यानंतर उर्वरित स्टार कॉस्टची चिंता वाढली आहे.