मुंबईः टीव्हीवरील लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम मंदार चांदवडकर मालिकेत आत्माराम भिडेच्या भूमिकेत दिसत आहे. मंदारच्या निधनाची बातमी काही वेळापूर्वी सोशल मीडियावर आगीसारखी पसरली, 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर मंदार यांनी स्वतःच इंस्टाग्राम लाईव्ह करत बातमीची सत्यता सांगून स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, मी पूर्णपणे ठीक आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्याच्याबद्दलच्या सर्व बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. 


मंदार यांनी लाईव्हमध्ये म्हटलं की, काही वेळापूर्वी एका व्यक्तीने मला बातमी फॉरवर्ड केली होती, त्यामुळे मी लाईव्ह येऊन सर्वांचे गैरसमज दूर करण्याचा विचार केला, कारण माझे चाहते काळजीत पडले आहेत. 



सोशल मीडियावर अफवा आगीपेक्षा वेगाने पसरतात. मला फक्त हे सांगायचं आहे की मी शूटिंग करत आहे आणि एन्जॉय करत आहे." 


मंदार पुढे म्हणाले की, जो कोणी ही बातमी पसरवत आहे, त्याला मी विनंती करतो की त्यांनी हे सर्व करणे थांबवावे. देव त्याला 'बुद्धी' देवो. 


'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे सर्व कलाकार निरोगी आणि आनंदी आहेत आणि असंच लोकांचे मनोरंजन करत राहतील