मुंबईः 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र खास आहे. प्रत्येकाच्या विविध तऱ्हा आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मालिकेतील एक अतरंगी पात्र म्हणजे बावरी. बागाची गर्लफ्रेंडची भूमिका करणारी बावरी अर्थात मोनिका भदौरिया मालिकेत अतरंगी पात्र साकारत आहे. बोलताना नेहमी नावात चुका करणारी आणि गलती से मिस्टेक म्हणत चुका सुधारणारी बावरी प्रेक्षकांनाही तितकीच भावते.


मात्र ही बावरी खऱ्या आयुष्यात खूपच वेगळी आहे. तिच्या सोशल मीडियावरील फोटो पाहून हीच बावरी का यावर तुमचा विश्वास बसणार नाही. 



मालिकेत खुळ्या मुलीची भूमिका करणारी बावरी खऱ्या आयुष्यात आहे सुपच सुंदर आणि स्मार्ट.



बावरी अर्थात मोनिका भदौरिया सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते आणि पिवळ्या रंगाच्या साडीत मोनिकाचं सौंदर्य आणखीच खुलून आलंय.



मोनिका मूळची मध्यप्रदेशची. तारक मेहता मालिकेत जवळपास 6 वर्ष मोनिकाने बावरीची भूमिका केली. मात्र तिचे चाहते आता तिला मालिकेत मिस करत आहेत.



बावरीला मालिकेत गलती से मिस्टेक करते मात्र फॅशनच्या बाबतीत मोनिका कुठेही मिस्टेक करत नाही. तिचा बोल्ड अँड ब्यूटिफूल अंदाज तिच्या फोटोंवरून दिसून येतो.



मोनिका एक चांगली अभिनेत्री तर आहेत तसंच एक चांगली चित्रकारही आहे..तिने काढलेले सुंदर पेन्टिंग तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत..अभिनयासोबतच तिचा आणखी एक गुण प्रेक्षकांना भावला आहे. तिच्या पेन्टिंगचंही तिच्या चाहत्यांकडून भरपूर कौतुक होत आहे.


(सौ. इन्स्टाग्राम)