मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक पाहिला जाणार कॉमेडी शो आहे. हा शो गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत या शोच्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांमध्ये विशेष ओळख मिळवली आहे. मात्र, 13 वर्षात अनेक कलाकार या शोमध्ये येवून गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही अभिनेत्री खूपच चर्चेत आहे
या शोमध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री निधी भानुशाली सोनूच्या भूमिकेत दिसली होती. तिच्या चेहऱ्याच्या निरागसतेने तिने प्रत्येकाची मने जिंकली. मात्र, तिने या शोला 2 वर्षांपूर्वीच निरोप दिला मात्र, ती तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.


निधीचे फोटो आश्चर्यचकित करतात
निधी नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्यामध्ये इतका बदल झाला आहे की, चाहत्यांना विश्वास बसत नाही की, तीच निरागस दिसणारी सोनू आहे. तसं, निधीचे फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवतात, पण कधीकधी तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.


सध्या निधीचा एक फोटो हेडलाईन्समध्ये आहे. यामध्ये ती हेवी मेकअपमध्ये गुलाबी रंगाचा टॉप परिधान करताना दिसत आहे. हा फोटो पाहून निधीचे चाहते खूपच स्तब्ध झाले आहेत. यावर कमेंट करत, युजर्सने लिहिलं आहे की, 'टप्पूने हे सगळं शिकवलं असावं.' त्याचवेळी दुसऱ्या युजर्सने लिहिलं की, 'भिडे काकांना कॉल करा.'



2012मध्ये पलक शोचा एक भाग बनली
निधी भानुशालीने 2012 मध्ये 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये प्रवेश केला होता. ती श्री भिडे यांची मुलगी सोनूच्या भूमिकेत दिसली होती. तिच्या आधी ही भूमिका झील मेहता करत साकारत होती. मात्र, निधीने 2019 मध्ये शो सोडला. सध्या ही भूमिका पलक सिधवानी साकारत आहे.