मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान टिकवून आहे. या शोच्या कलाकारांनी दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता या शोमध्ये बालकलाकाराची भूमिका साकारणारी मुलंही मोठी झाली आहेत, पण आजही चाहते त्यांना त्या पात्राच्या नावानेच ओळखतात. टप्पू असो, गोली असो की सोनू, ते सगळ्यांचेच फेवरेट बनले आहेत.


फोटो व्हायरल


तारक मेहताच्या कलाकारांचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. या शोच्या नावाने इंस्टाग्रामवर शेकडो फॅन फेज तयार झाले आहेत. यापैकी एका फॅन पेजवर थ्रोबॅक फोटो शेअर करण्यात आला आहे.


हा फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत. कारण एक मुलगी टप्पूचा बेस्ट फ्रेंड गोली म्हणजेच कुश शाहला किस करताना दिसत आहे.


गोलीला किस करणारी ही व्यक्ती कोण?


व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये शोमध्ये रिटा रिपोर्टरची भूमिका करणारी प्रिया आहुजा गोली म्हणजेच डॉक्टर हाथीचा मुलगा आणि टप्पू सेनेचा सदस्य कुश शाह याला किस करताना दिसत आहे.


वास्तविक, हा फोटो प्रियाच्या लग्नातील आहे, जेव्हा तारक मेहताच्या सर्व कलाकारांनी पार्टीला हजेरी लावली होती. यादरम्यान प्रियाने शोमधील सर्वात गोंडस अभिनेता कुशला किस केले होते.



लोकांना पडतोय प्रश्न 


तारक मेहताच्या फॅन पेजवर व्हायरल झालेल्या या फोटोबद्दल लोक कुशला प्रश्न विचारत आहेत. काही जण म्हणतायेत, काहीतरी गडबड आहे. त्याच वेळी, काहींना कुशसोबत असलेली मुलगी कोण आहे हे समजू शकलेले नाही.