मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा लोकांचा आवडता कॉमेडी शो आहे. लोकांना या शोचे प्रत्येक पात्र खूप आवडते. लोकांचा जेठालालच्या कुटुंबाशी विशेष संबंध आहे. चाहत्यांना या कुटुंबातील प्रत्येक सदस्याबद्दल प्रत्येक माहिती मिळवायची आहे. पण तुम्हाला माहित आहे का या फोटोमध्ये असलेला हा मुलगा कोण आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे प्रत्येक पात्र लोकांच्या हृदयात आहे. पण फोटोमधील मुलाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? हा मुलगा आजच्या काळात शोचा महत्त्वाचा भाग आहे. हा मूलगा आता मोठा झाला आहे आणि सोशल मीडियावर त्याचं फॅन फॉलोविंग आहे. क्रिकेटर रोहित शर्मासोबत फोटो काढलेला हा मुलगा कोण आहे हे तुम्ही ओळखू शकता का?


जर तुम्ही अजूनही ओळखू शकत नसाल, तर हा मुलगा सध्या मालिकेत टपूचं पात्र साकारत असलेला राज अनाडकट (Raj Anadkat)आहे. होय, हा बालपणीचा फोटो टप्पूची भूमिका साकारणाऱ्या राज अनाडकटचा आहे. लहानपणी गुबगुबीत दिसणारा राज आता पूर्णपणे फिट आहे.



मुनमुन दत्ताशी जोडलं गेलं होतं नाव 


राज अनाडकटचे नाव अलीकडेच सहकलाकार मुनमुन दत्तासोबत जोडले गेले. अभिनेता या बातम्यांना कंटाळला होता आणि त्याने यावर सोशल मीडियाद्वारे आपलं स्पष्टीकरणही दिलं आहे.