मुंबई : तारक मेहेता हा टीव्हीवरील एक प्रसिद्ध शो आहे आणि याचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. या शोमधील सगळ्याच कलाकरांनी आपल्या विशिष्ट भूमिकेमुळे सर्वांच्याच मनात आपलं वेगळं स्थान तयार केलं आहे. त्यामुळे या शोमधील सगळ्याच कलाकारांबद्दल जाणून घ्यायला लोकं उत्सुक असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या शोमधील काही अशा गोष्टी सांगणार आहोत, ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल आणि तुम्ही कदाचित या गोष्टी ऐकून थक्का व्हाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2008 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या शोला 13वर्ष झाली, तरी देखील याचा चाहता वर्ग वाढतच चालला आहे.


जेठालालचं वय बापूजीपेक्षा जास्त


‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील बापूजी म्हणजेच अमित भट, ज्यांनी शोमध्ये जेठालालच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की बापूजी हे त्यांच्या ऑन स्क्रीन मुलापासून म्हणजे जेठालालपासून खऱ्या आयुष्यात वयाने लहान आहेत.


अमित भट यांचा जन्म 1974 मध्ये झाला, तर दिलीप जोशी यांचा जन्म 1968 मध्ये झाला, म्हणजेच या दोघ्यांच्या वयामध्ये 6 वर्षाचा फरक आहे. म्हणजेच बापूजीचे वय जेठालालपेक्षा ही कमी आहे.


पत्रकार पोपटलाल


शोमध्ये पत्रकारची भूमिका साकारणारा पोपटलाल म्हणजेच श्याम पाठक याचं लग्न शोच्या आधीपासूनच झालं आहे. त्याच्या बायकोचं नाव रेश्मी आहे. हे दोघेही नेशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD)मध्ये एकमेकांना भेटले आहे. आता पोपटलालला 3 मुलं आहेत..


दया आणि सुंदरलाल खऱ्या आयुष्यात भाऊ-बहीण


ऑन स्क्रीन भाऊ-बहीणीची भूमिका साकारणारे दया भाभी म्हणजे दिशा वकाणी आणि सुंदरलाल म्हणजेच मयूर वकाणी हे खऱ्या आयुष्यात देखील भाऊ-बहीण आहेत. सध्या 2017 पासून दया भाभी शोचा भाग नाही, तेव्हापासून शोमध्ये दया भाभीची जागा खाली आहे. परंतु शोमध्ये तिच्या जागी अद्याप कोणतीही नवीन व्यक्ती आलेली नाही. दया भाभीली शोमध्ये पाहण्यासाठी लोकं आतुरतेनं वाट पाहत आहेत.


भीडे इंजिनिअर


गोकूळधाम सोसयटीचा एकमेव सेक्रेटरी आणि कडक ट्यूशन टिचर असलेले मास्तर भीडे यांचं नाव मंदार चंदावाडकर आहे. ते खऱ्या आयुष्यात मॅकेनिकल इंजिनिअर आहे. तसेच त्यांनी दुबईमध्ये 3 वर्ष इंजिनिअर म्हणून काम केलं आहे.


लोकांमुळे बाघाला भूमिका मिळाली


शोमध्ये बाघाची भूमिका साकारणारा बाघा म्हणजेच तन्मय वेकारिया शोच्या सुरूवातीला कधी रिक्षा चालक, तर कधी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून दिसायचा. शोच्या मेकर्सनी याच्या भूमिकेबद्दल काही नियोजन केले नव्हते. परंतु नंतर नट्टू काका आजारी पडल्यानंतर जेठालाल यांच दुकान सांभाळण्यासाठी बाघाला आणलं गेलं आणि लोकांनी आता यांच्या भूमिकेला स्वीकारलं देखील आहे.


टप्पू आणि गोगीचं नातं


भव्य गांधी म्हणजेच टप्पू आणि समय शाह म्हणजे गोगी खऱ्या आयुष्यात भाऊ आहेत. ते एकमेकांचे चूलत भाऊ आहेत. तर टप्पू म्हणजे भव्य गांधीने 2017 साली शोला रामराम ठोकला होता.
भव्य गांधी आतापर्यंत टीव्ही इंडस्ट्रीत सर्वात जास्त पैसे घेणार बाल कलाकार ठरला आहे. तो शोमध्ये असताला प्रत्येक एपिसोडचे 10 हजार रुपये घ्यायचा.


अय्यरची भूमिका अशी आली


कृष्णन सुब्रमण्यम अय्यरची भूमिका साकारणारे तनुज महाशब्दे हे शोच्या सुरूवातीला लेखकांपैकी एक होते. परंतु नंतर दिलीप जोशी यांनी शोमध्ये एक तमिलियन-बंगाली कपल आणण्याचा विचार मेकर्स पुढे ठेवला ज्यानंतर त्या जोडीने शोमध्ये काय धम्माल आणि हे काही वेगळं सांगायला नको.


...तर जेठालाला असता बापूजी


शोच्या सुरूवातीला त्याच्या मेकर्सने जेठालाल म्हणजेच दिलीप जोशीला बापूजीची भूमितका साकारण्याची ऑफर दिली. परंतु त्याने ती नाकरली आणि मग त्याला शोमध्ये जेठालालची मुख्य भूमीका देण्यात आली जी त्याने मनापासून निभावली, जी सध्या लोकांच्या मनावर राज्य करत आहे.


गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड


शोने 2020 मध्ये 3 हजार एपीसोड पूर्ण करत टेलीव्हीजनवरील सर्वात जास्त टाईमपर्यंत चालणारी मालिका ठरली. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’2008साली सुरू झाली. ज्याची कहाणी जेठालाल आणि गोकूळधाम सोसोयटीच्या आवतीभवती फिरते.


एका मुलाखतीत दिलीप जोशीने सांगितले की, "मी थिएटरमध्ये बॅकस्टेज आर्टीस्ट म्हणून काम केलं आहे, त्यावेळेस कोणीही मला रोल देण्यासाठी तयार नव्हतं, त्यावेळेला मला काम करण्यासाठी 50 रुपये मिळायचे. परंतु मी या गोष्टीची कधीही परवा केली नाही. कारण मला कमी वयापासून थेएटरमध्ये काम करण्याची इच्छा होती."