Jheel Mehta Roka Ceremony : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत छोट्या सोनूची भूमिका साकारणारी झील मेहता सगळ्यांच्या लक्षात आहे का? तिच झील आता लग्न बंधनात अडकणार आहे. तिच्या रोक्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. झील मेहतानं बॉयफ्रेंड आदित्य दुबेसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यागोष्टीला घेऊन ती फार उत्साही आहे. ते दोघं गेल्या बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. झील मेहताच्या रोका सेरिमनीचे फोटो प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झील मेहतानं तिच्या रोकाच्या कार्यक्रमाचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. रोकासाठी झीलनं लाइट ब्लू रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर तिचा होणारा नवरा आदित्यनं तिच्या ड्रेसला मॅच होतील असे कपडे परिधान केले आहे. दोघांची जोडी खूप चांगली दिसते. तिनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या सासू-सासऱ्यांचे देखील फोटो पाहायला मिळत आहेत. हे फोटो शेअर करत झीलनं कॅप्शन दिलं आहे की 'नवी सुरुवात आणि नवे फोटो'.



हेही वाचा : कोण आहे श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड? पहिल्यांदाच दिसले एकत्र


लक्षवेधी गोष्ट म्हणजे झील मेहतानं तिच्या रोक्याच्या कार्यक्रमासाठी स्वत: मेकअप केला होता. तर त्यांच्या या कार्यक्रमात फक्त दोन्ही कुटुंबातील जवळचे लोक उपस्थित होते. झील आणि आदित्य यांच्यात 10 वीत असताना बोलणं सुरु झालं आणि तेव्हा पासून ते सोबत आहेत. 


आता काय करते झील मेहता?


झील मेहतानं एक चाइल्ड आर्टिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली. तिचा पहिला शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' होता. तेव्हा झील ही फक्त 9 वर्षांची होती. त्यानंतर पुढचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी झीलनं ती मालिका सोडली. आचा झील मेहता ही एक मेकअप आर्टिस्ट आहे. झील तिच्या आईसोबत या प्रोफेशनमध्ये आहे. तिची आई हेअर स्टायलिस्ट आहे. झील सतत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना दिसते. याआधी झीलनं त्यांनी जेव्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सगळा कार्यक्रम कसा झाला त्याचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओत झीलला पाहून तारक मेहताच्या चाहत्यांना फार आनंद झाला होता आणि सोनू इतकी मोठी झाली यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. 


काय करतो झीलचा होणारा नवरा? 


झील मेहताचा होणारा नवरा आदित्य दुबे हा एक व्हिडीओ कंटेन्ट क्रिएटर आहे.