मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील जेठालाल अर्थात अभिनेते दिलीप जोशी यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरु आहे. लवकरच त्यांची मुलगी नियती विवाहबंधनात अडकणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलीच्या संगीत कार्यक्रमात सर्वांचे लाडके दिलीप जोशी यांनी जबरदस्त डान्स केले. त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात ते डान्स फ्लोअरवर ड्रम वाजवताना नाचताना दिसत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 मुलीच्या संगीत सोहळा, 'जेठालाल'चा जबरदस्त डान्स


दिलीप जोशींनी निळा कुर्ता परिधान केला आहे. मुलीच्या लग्नाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. संगीत समारंभात गरबा आणि दांडिया खेळला जात असल्याचं दिसत आहे.


'जेठालाल'चा पार्टीत आनंदीत होऊन जोरदार डान्स करताना दिसत आहे. संगीत रात्रीचा हा व्हिडिओ जबरदस्त आहे ज्यात दिलीप जोशी ढोलाच्या तालावर नाचत आहेत. संगीत नाईटमध्ये त्यांनी डान्सच नव्हे, तर गाणं ही गायलं आहे.


दिलीप जोशींची ही स्टाईल चाहत्यांना पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. दिलीप जोशी यांनीही दांडिया खेळले.


मुलीच्या संगीतात त्यांचा फुल ऑन स्वॅग दिसला आहे. संगीत पार्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये दिलीप जोशी त्यांच्या घरात गृहशांती पूजा करताना दिसत होते. यामध्ये ते त्याच्या कुटुंबियांसोबत दिसत आहे.