अरेच्चा हे कसं झालं? `लेडी जेठालाल` सोशल मीडियावर व्हायरल
तिनं स्वतःला इतकं हुबेहूब जेठालालसारखं बनवलंय की लोक तिला सहज ओळखू शकत नाहीत.
लोकप्रिय हिंदी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सर्वांचीच लाडकी आहे. या शोची मुख्य भूमिका 'जेठालाल'ने केली आहे. जेठालालचे पात्र इतके लोकप्रिय झाले आहे की आता त्याचे सीन मीम्समध्येही वापरले जातात.
जेठालालचे मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, परंतु एका मेकअप आर्टिस्टने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. तिनं स्वतःला इतकं हुबेहूब जेठालालसारखं बनवलंय की लोक तिला सहज ओळखू शकत नाहीत
भारतात प्रतिभेची कमतरता नाही. सोशल मीडिया हे आता कोणत्याही व्यक्तीसाठी त्यांचं कौशल्य दाखवण्याचं एक सोपं व्यासपीठ बनलं आहे. अशीच एक व्यक्ती आहे दिक्षिता जिंदल जी दिल्लीची मेकअप आर्टिस्ट आहे. ती आपल्या कलेने लोकांना आश्चर्यचकित करणारे परिवर्तन दाखवू शकते.
तिने नवीन व्हिडिओमध्ये असेच काही दाखवले आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय टीव्ही शोमधील पात्र जेठालालप्रमाणे दीक्षिताने तिचा चेहरा बदलला. हा व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
जेठालालची भूमिका अभिनेते दिलीप जोशी यांनी केली आहे. व्हायरल ट्रान्सफॉर्मेशन हे टिगिनी नावाच्या ट्रेंडिंग इंस्टाग्राम चॅलेंजचा एक भाग आहे. व्हिडिओमध्ये दीक्षिताने चेहऱ्यावर मेकअप आणि जेठालालसारखा शर्ट घातलेला दिसत आहे.
ती हुबेहुब जेठालालसारखी दिसते. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'तुम्ही सर्वांनी जेठालालसारखा मेकअप करायला सांगितल्याचं मी ऐकले आहे? त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण झाली. मी स्वतःला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' वरून 'जेठालाल'मध्ये बदलले. आशा आहे की तुम्हाला ते आवडले असेल.'